रत्नागिरी ः मासेमारी आरंभाचा नारळीपौर्णिमेचा मुहूर्त टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मासेमारी आरंभाचा नारळीपौर्णिमेचा मुहूर्त टळला
रत्नागिरी ः मासेमारी आरंभाचा नारळीपौर्णिमेचा मुहूर्त टळला

रत्नागिरी ः मासेमारी आरंभाचा नारळीपौर्णिमेचा मुहूर्त टळला

sakal_logo
By

- rat11p19.jpg-
४२५१७
रत्नागिरी ः कासारवेली येथील मच्छीमारी नौका वादळ थांबण्याच्या प्रतीक्षेत.

मच्छीमारांचा नारळी पौर्णिमेचा टळला मुहूर्त
---
खोल समुद्रात वादळ; करावी लागणार प्रतीक्षा
रत्नागिरी, ता. ११ ः खोल समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे मासेमारीला जाण्याचा नारळी पौर्णिमेचा मच्छीमारांचा मुहूर्त टळला आहे. किनारी भागात गेले काही दिवस वेगवान वारे वाहत आहेत. पौर्णिमेच्या उधाणामुळेही समुद्र खवळला असून, मोठ्या लाटा उसळत आहेत. समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीचा प्रारंभ करणाऱ्यांना मासेमारी सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.
शासनाच्या निर्देशानुसार, १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली; परंतु कोकणात सर्रास नारळी पौर्णिमा झाली की मच्छीमारीला प्रारंभ होतो. मच्छीमार समुद्राला नारळ अर्पण करून नौका समुद्रात घेऊन जातात. गेले आठ दिवस मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांनी मच्छीमारांची वाट अडवली आहे. बंदी संपुष्टात आल्यावर हर्णै, मिरकरवाडा, जयगड येथील काही मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवात केली; परंतु वादळ सुरू झाल्यावर ते माघारी परतले. समुद्र खवळलेला असून, अजस्त्र लाटा उठत आहेत. यात नौका स्थिर राहणे शक्य नाही. कदाचित अनुचित प्रकारही घडू शकतात. धोका पत्करण्यापेक्षा मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावरच उभ्या करून ठेवणे पसंत केले आहे.
श्रावण महिना सुरू असून, ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कालावधीत मासळीला कमी मागणी असते. त्यामुळे दरावरही त्याचा परिणाम होतो. रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी, मिऱ्या, कासारवेली, दापोलीतील पाजपंढरी, हर्णै; तर राजापूरमधील नाटेसह आजूबाजूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांना नारळी पौर्णिमेनंतर वातावरण स्थिरावेल, अशी आशा होती. हवामान विभागाच्या सूचनेनुसार, सध्या तरी वातावरण निवळेल, अशी शक्यता नाही. अजून चार दिवस पाऊस आणि वारा राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. जिल्ह्यात ट्रॉलिंग, गिलनेटसह छोट्या यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी करणाऱ्या कुटुंबांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांचे नुकसान होत आहे.
---
कोट
वातावरण पोषक नसल्याने मच्छीमारांना समुद्रात जाणे शक्य नाही. ११ दिवस झाले असून, मच्छीमारांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांनाही सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे.
- अभय लाकडे, मच्छीमार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86303 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..