रावराणेंनी घेतली मंत्री चव्हाणांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रावराणेंनी घेतली 
मंत्री चव्हाणांची भेट
रावराणेंनी घेतली मंत्री चव्हाणांची भेट

रावराणेंनी घेतली मंत्री चव्हाणांची भेट

sakal_logo
By

टीपः swt1138.jpg-KOP22L42581 मुंबई ः मंत्री रवींद्र चव्हाण यांना पुस्तक भेट देताना प्रमोद रावराणे.

रावराणेंनी घेतली
मंत्री चव्हाणांची भेट
वैभववाडी, ता. ११ ः जिल्ह्याचे पुत्र माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील प्रलबिंत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले.
गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्गात भाजपाचे संघटन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या श्री. चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रावराणे यांनी त्यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजन चिके, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे आदी उपस्थित होते. रावराणे यांनी जिल्ह्यातील काही प्रलंबित प्रश्नांविषयी मंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86311 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..