हर्णै-पाजपंढरीत नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमारांची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-पाजपंढरीत नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमारांची मिरवणूक
हर्णै-पाजपंढरीत नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमारांची मिरवणूक

हर्णै-पाजपंढरीत नारळी पौर्णिमेनिमित्त मच्छीमारांची मिरवणूक

sakal_logo
By

rat11p28.jpg-
42589
पाजपंढरी (ता. दापोली) ः नारळी पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी महिला.
------------
पाजपंढरीत नारळी पौर्णिमेनिमित्त
मच्छीमारांची मिरवणूक
हर्णै, ता. ११ः दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण मच्छीमार बांधव एकवटून मिरवणूक काढली होती. जेजुरीचा खंडोबा, भारतमाता आदींची वेशभूषा साकारली होती.
मच्छीमार समाजाचा पारंपरिक पद्धतीचा पेहराव करून नाचत, वाजतगाजत संपूर्ण पाजपंढरी गावातून सकाळी ही मिरवणूक काढली होती. यामध्ये शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. या वेळी हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थी घोषणा देत होते. तब्बल दोन वर्षांनी एवढ्या उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करायला मिळाल्यामुळे बहुसंख्य मच्छीमार उत्साहाने सहभागी झाले होते. त्यानंतर पाजपंढरी येथील बंदरात त्या सोन्याने मढवलेल्या नारळाचे पूजन करून हे समुद्रदेवता आता शांत हो आणि आम्हाला आमच्या चालू होणाऱ्या उद्योगामध्ये चांगले भरघोस यश दे, अशी प्रार्थना मच्छीमार बांधवांनी केली आणि समुद्राला नारळ अर्पण केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86317 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..