चिंदर-तेरईत भूस्खलनाचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंदर-तेरईत भूस्खलनाचे सावट
चिंदर-तेरईत भूस्खलनाचे सावट

चिंदर-तेरईत भूस्खलनाचे सावट

sakal_logo
By

42576
चिंदर ः उत्तम घागरे यांच्या घराच्या पडवीवर आलेले दगड, मातीचे ढीग.

वाढावा फोटो
42575
चिंदर (ता. मालवण) ः येथील डोंगर खचू लागल्याने गावात भीतीचे वातावरण आहे.


चिंदर-तेरईत भूस्खलनाचे सावट
डोंगर खचतोय; दगड, मातीचे ढीग वस्तीच्या दिशेने
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ११ ः सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका मालवण तालुक्यातील चिंदर-तेरईला बसला आहे. येथील डोंगर खचू लागला असून, उत्तम घागरे यांच्या घरामागील बाजूच्या पडवीवर दगड, मातीचे ढीग येऊन धडकले आहेत. घराच्या काही भिंतींसह जमिनीला तडे गेले आहेत. या घरातील कुटुंबीय मुंबईला गेले असल्याने घर बंद आहे. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्याने मांगर कोसळण्याची स्थिती आहे. यामुळे भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर महसूल प्रशासनाने घागरे यांच्या बंद घरावर धोकादायक परिस्थितीमुळे स्थलांतरित होण्याची नोटीस चिकटवली आहे.
चिंदर-तेरई येथील घागरे यांच्या घरालगतचा डोंगर मागील वर्षी जुलैमध्ये खचला होता. त्यावेळी घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचबरोबर घराबाजूने जाणाऱ्या रस्त्याचीही उंची वाढली होती. घागरे कुटुंबीय कामानिमित्त मुंबईला गेले असून त्यांचे घर बंद आहे. बुधवारी सायंकाळी त्यांच्या घरामागील डोंगराचा भाग कोसळून घरावर सरकत असल्याचे काही ग्रामस्थांनी पहिले. भूस्खलन होऊन घरामागील बाजूच्या पडवीवर मोठ्या प्रमाणात दगड, मातीचे ढीग येऊन धडकले होते. घराच्या काही भिंतींना आणि तेथील जमिनीलाही तडे गेले आहेत. समोरील मांगराच्या सर्व चिरेबंदी भिंतींसह जमिनीला भेगा आहेत.
घटनेची माहिती ग्रामपंचायतीसह महसूल प्रशासनास दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, सदस्य शशिकांत नाटेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर, ग्रामस्थ रवी घागरे, सुभाष सावंत, किशोर खोत, पोलिसपाटील दिनेश पाताडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

प्रशासन, महसूल, आमदारांचे दुर्लक्ष
गतवर्षीची घटना ताजी असताना पुन्हा यावर्षीही भूस्खलन झाले. मागील वर्षी घटना घडूनही प्रशासन, महसूल स्थानिक आमदारांनी कोणतीही दखल घेतली नाही. आमदार, महसूल प्रशासनाकडून पाहणी करण्यापलीकडे कोणतेही काम झालेले नाही. प्रशासनाला सक्तीच्या सूचना देऊन तत्काळ महसूल प्रशासनाकडून उपाय योजना किंवा यावर पर्याय काढणे गरजेचे होते; मात्र या वर्षीचा पावसाळा अर्ध्यावर आला तरी याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. महसूल प्रशासन फक्त नोटिसा बजावत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सांगत चिंदर सरपंच राजश्री कोदे यांनी पाहणीदरम्यान संताप व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86318 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..