सर्पदंशाने बुरंबी येथील प्रौढाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पदंशाने बुरंबी येथील प्रौढाचा मृत्यू
सर्पदंशाने बुरंबी येथील प्रौढाचा मृत्यू

सर्पदंशाने बुरंबी येथील प्रौढाचा मृत्यू

sakal_logo
By

सर्पदंशाने बुरंबी येथील प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी, ता. ११ः बुरंबी-तेरेवाडी (ता. संगमेश्वर) येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. उपचारादरम्यान येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मोहन यशवंत निकम (वय ५४, रा. तेरेवाडी-बुरंबी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहन निकम हे बुधवारी (ता. १०) सकाळी नदीवर गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या पायाला फुरसे या विषारी सापाने दंश केला. नातेवाईकांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची खबर त्यांचा मुलगा संजय निकम यांनी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86322 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..