कणकवली : मोटरसाकल चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : मोटरसाकल चोरी
कणकवली : मोटरसाकल चोरी

कणकवली : मोटरसाकल चोरी

sakal_logo
By

मोटरसायकल चोरीतील
अट्टल गुन्हेगार ताब्यात
सिंधुदुर्गासह कोल्हापूर, बेळगावमधून चोरल्या १८ मोटर सायकल
कणकवली,ता. ११ ः सिंधुदुर्गासह कोल्हापूर, बेळगाव येथून तब्बल १८ मोटर सायकल चोरीतील अट्टल गुन्हेगार कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. युवराज संजय पवार (वय ३६) आणि विनायक तानाजी कवटी (वय ३८ दोन्ही रा. निपाणी) अशी त्यांची नावे असून त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. बेळगाव पोलिसांनी त्यांना मोटरसायकल चोरीच्या गुन्हात अटक केली होती. तेथील तपासात फोंडाघाट येथील चोरीची कबुली संशयीतांनी दिली आहे. या गुन्हा एकूण चार संशय़ीत आहेत. त्यापैकी दोघांना आज अटक करण्यायात आली.
तालुक्यातील फोंडाघाट येथून मोटरसायकल चोरीस गेली होती. ही चोरी २७ जूनच्या रात्रीच्या सुमारास झाली होती. याप्रकरणी योगेश अनंत सापळे (वय ३२, रा. फोंडाघाट गांधीचौक) यांनी पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीत म्हटले आहे की, फोंडाघाट बाजारपेठेमध्ये उगवाई क्याशु नावाची दुकान आहे. तेथे २७ जूनला दुकान बंद करून रात्री आठच्या सुमारास मोटरसायकल (एम.एच.०७ यु ०६८६) घेऊन घरी परतलो. गांधी चौक येथे राहत्या घराच्या बाहेर शेडमध्ये मोटरसायकल उभी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र, ती मोटरसायकल जाग्यावर नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध केली. परंतु, मोटरसायकल न सापडल्याने त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्यावेळी अनोळखी संशयित आरोपीवर मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या चोरीतील मोटरसायक बेळागाव पोलिसांनी जप्त केली आहे. तेथील न्यालायातून ही गाडी पोलिसा ताब्यात घेणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86328 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..