पान तीन मेन-नेमळे ग्रामपंचायत कार्यालय फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान तीन मेन-नेमळे ग्रामपंचायत कार्यालय फोडले
पान तीन मेन-नेमळे ग्रामपंचायत कार्यालय फोडले

पान तीन मेन-नेमळे ग्रामपंचायत कार्यालय फोडले

sakal_logo
By

टीपः swt1142.jpg -KOP22L42594
नेमळे ः येथील ग्रामपंचायत कार्यालयातील चोरट्यांनी फोडलेले कपाट.

नेमळे ग्रामपंचायत कार्यालय फोडले
लॅपटॉप, थम मशीन लंपास ः पोस्ट कार्यालयातही चोरी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. 11 ः तालुक्यातील नेमळे ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार काल (ता.10) सकाळी निदर्शनास आला. चोरट्याने ग्रामपंचायत कार्यालयातून लॅपटॉप लंपास व थम मशीन असा 16 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची तक्रार उपसरपंच विक्रम बाबली पांगम यांनी दिली. त्यानुसार पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सावंतवाडी शहरासह तालुक्यात तसेच मालवण तालुक्यात गेल्या महिनाभरात चोरी व घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. याप्रकरणी सोलापूर येथील सचिन माने नामक संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही चोरी प्रकरणात त्याने कबुलीही दिली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, गेल्या काही दिवसात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे हे चोरटे नेमके कोण? हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
झाराप पत्रादेवी बायपास लगत नेमळे ग्रामपंचायत असल्याने चोरट्यांनी नेमळे ग्रामपंचायत व पोस्ट कार्यालयाला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. सकाळी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यास गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर उपसरपंच पांगम यांनी सावंतवाडी पोलिसांना याबाबत कल्पना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली, पोलिस हेड कॉस्टेबल महेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन चोरीचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील कपाट कटावणीने उघडून आतील चार वर्षे पूर्वीचा सुमारे 15 हजार किंमतीचा जुना लॅपटॉप व दिड हजार रुपयाचे थम मशीन असा सुमारे 16 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी चोरट्यांनी कपाटातील कागदपत्रे विस्कटल्याचे समोर आले. नजिकच्या पोस्ट कार्यालयातही चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी त्यांना काही हाती लागले नाही, असे पोलीस उपनिरीक्षक तेली यांनी.


चौकट
श्वान पथक, ठसे तज्ञ दाखल
दुपारी उशिरा श्वान पथक व ठसे तज्ञ यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत तपास केला. यावेळी श्वान ग्रामपंचायत कार्यालयापासून मंदिरापर्यंत घुटमळला. यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक कोरे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86330 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..