देवगडात नारळी पौर्णिमा पारंपरिक पध्दतीने साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात नारळी पौर्णिमा 
पारंपरिक पध्दतीने साजरी
देवगडात नारळी पौर्णिमा पारंपरिक पध्दतीने साजरी

देवगडात नारळी पौर्णिमा पारंपरिक पध्दतीने साजरी

sakal_logo
By

टीपः swt1143.jpg KOP22L42615

ओळ - देवगड ः येथील बंदरावर पारंपरिक पध्दतीने सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांच्यासह अन्य उपस्थित होते. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडात नारळी पौर्णिमा
पारंपरिक पध्दतीने साजरी
देवगड, ता. ११ ः येथे पारंपरिक पध्दतीने आज नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मच्छीमारांनी विधीवत पूजेसह सागराला श्रीफळ अर्पण करून शांत होण्याचे आवाहन केले. यानिमित्ताने बंदरावर पारंपरिक पध्दतीने पूजा करण्यात आली. दरम्यान, तालुक्यात ठिकठिकाणी खाडीकिनारच्या मच्छीमार बांधवांनीही नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा केला.
ढोलताशांच्या गजरात येथील शहरातून वाहनांची रॅली काढण्यात आली. बंदरावर विधीवत पूजा केल्यानंतर पोलिस यंत्रणा, प्रशासन, उद्योजक, व्यापारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, पोलिस प्रवीण सावंत, मिलिंद परब, देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, शरद शिंदे, अनिल खडपकर, विकास गोठोस्कर, अवी खानविलकर, दिनेश मेस्त्री, प्रा. महेंद्र कामत, प्रा. चंद्रकांत भेंकी, सदानंद सावंत उपस्थित होते. पूजा झाल्यावर सागराला सामूहिकपणे श्रीफळ अर्पण करण्यात आले. बंदरावर श्रीफळ अर्पण करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत नागरिकांची ये-जा सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86337 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..