वादळी वाऱ्यासह झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळी वाऱ्यासह झोडपले
वादळी वाऱ्यासह झोडपले

वादळी वाऱ्यासह झोडपले

sakal_logo
By

४२६२१
मालवण ः नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेला भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वादळी वाऱ्यासह झोडपले
सावंतवाडी, दोडामार्गात पावसाचा जोर; नारळी पौर्णिमेच्या उत्साहावर पाणी
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः दोन दिवस जोर ओसरलेल्या पावसाने आज सायंकाळी किनारपट्टीच्या तालुक्यांसह सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याला वादळी वाऱ्यांसह अक्षरक्षः झोडपून काढले. नारळी पौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांवर पावसाने पाणी फेरल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. दरम्यान, समुद्राला उधाण असून वाऱ्याचा वेगदेखील वाढलेला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसांपासून काहीसा कमी झाला होता. बुधवारी दिवसभर काही भागात उघडीप तर काही भागात हलक्या सरी होत्या. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील घट झाली. आज सकाळपासून देखील पावसाचे प्रमाण कमी होते. अधुनमधून सरी कोसळत होत्या, जोर नव्हता. मात्र, सायंकाळी चारपासून किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला. मालवण, वेंगुर्ले, देवगड भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मालवण तालुक्याला तर पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. वेंगुर्लेतदेखील जोरदार पाऊस सुरू आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्त किनारपट्टीच्या तालुक्यांसह अन्य ठिकाणीदेखील विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मालवण आणि वेंगुर्ले किनारपट्टीवर समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती; परंतु, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कार्यक्रमांवर पाणी फेरले. याशिवाय नारळ लढविण्याच्या खेळांसाठी उभारण्यात आलेले मंडपदेखील वादळाने कोसळून पडले. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर पावसाचे विरजण पडल्याचे चित्र होते. किनारपट्टीसह सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागाला देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. वैभववाडी, कणकवली तालुक्यातदेखील सायंकाळी उशिरा जोरदार पाऊस झाला.

चौकट
आज दमदार पावसाचा अंदाज
जिल्ह्यात तीन ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता. १२) दमदार पावसाचा अंदाज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86361 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..