जोरदार पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोरदार पावसाने झोडपले
जोरदार पावसाने झोडपले

जोरदार पावसाने झोडपले

sakal_logo
By

४२६४६
मळगाव : येथील घाटात मोडून पडलेल्या फांद्या.
माजगावात सोसाट्याच्या वाऱ्याने नुकसान
सावंतवाडी ः गेल्या काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे माजगाव गावात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून व तुटून पडले. यामुळे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाले आहेत. माजगाव ग्रामपंचायत लगत एक झाड रस्त्यावर कोसळले असून यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. खोतवाडा परिसरात अन्य दोन झाडेही कोसळली आहेत. माजगाव खालची आळी व अन्य भागातही वृक्ष उन्मळून पडले आहेत. माजगाव खोत वाडा येथील मूर्तीकार काका सावंत यांच्या मांगराचे झाड कोसळून नुकसान झाले. झाड कोसळून रस्त्यावर तयार झालेल्या चरात माजगाव येथे आलेल्या एका व्यक्तीची चार चाकी गाडी रुतून बसली. झाडे, फांद्या पडल्यामुळे महावितरणची बत्तीही गुल झाली. त्यामुळे माजगाव परिसरात काळोखाचे साम्राज्य आहे. सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत देखील चार ते पाच झाड्यांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने एक मार्गी वाहतूक सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86401 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..