रत्नागिरी-बँकेत वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्षाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-बँकेत वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्षाची मागणी
रत्नागिरी-बँकेत वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्षाची मागणी

रत्नागिरी-बँकेत वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्षाची मागणी

sakal_logo
By

बँकेत वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्ष हवा

रत्नागिरीतील मेळाव्यात निवृत्ती वेतनधारकांनी मांडले प्रश्न
रत्नागिरी, ता. १२ ः कोषागार कार्यालयाकडून निवृत्तीवेतन धारकांना उत्तम सेवा दिली जाते. कोरोना महामारीच्या काळातही कोषागाराकडून योग्य वेळेत निवृत्तीवेतन अदा केले जाते होते. याबद्दल निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगल्या सेवेबद्दल कौतुक केले. मात्र, काही बँकेच्या शाखेमध्ये सेवानिवृत्त वेतनधारकांना योग्य वागणूक दिली जात नाही. त्यामुळे बँकेने निवृत्ती वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी केली.
जिल्हा कोषागार कार्यालय येथे शुक्रवारी (ता. १२) सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा झाला. मेळाव्याला जिल्हा कोषागार अधिकारी श. वाघमारे, अप्पर कोषागार अधिकारी रवींद्र मोरे, अप्पर कोषागार अधिकारी पेन्शन विभाग एम. एम. जगदाळे, पेन्शन विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी शिवनाथ चन्ने, उपलेखापाल गायत्री मयेकर, अध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी संघटना वसंत झगडे उपस्थित होते. निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे समाधान कोषागार कार्यालयामार्फत केले जाईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी वाघमारे यांनी सांगितले.
...
चौकट
योग्य वागणूक दिली जात नाही
काही बँकेच्या शाखेमध्ये सेवानिवृत्त वेतनधारकांना योग्य वागणूक दिली जात नाही तरी बँकेने निवृत्ती वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी उपस्थित निवृत्ती वेतनधारकांनी केली. पेन्शन विभागाच्या अप्पर कोषागार अधिकारी जगदाळे, पेन्शन विभागाचे शिवनाथ चन्ने, गायत्री मयेकर यांनी निवृत्ती वेतनधारकांच्या शंकाचे निरसन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86585 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..