शिक्षकांचे वेतन ‘झेडपीएफएमसी’द्वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांचे वेतन ‘झेडपीएफएमसी’द्वारे
शिक्षकांचे वेतन ‘झेडपीएफएमसी’द्वारे

शिक्षकांचे वेतन ‘झेडपीएफएमसी’द्वारे

sakal_logo
By

42941
सिंधुदुर्गनगरी ः ‘झेडपीएफएमसी’ सुविधेचे उद्‍घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर.

शिक्षकांचे वेतन ‘झेडपीएफएमसी’द्वारे

संघटनेला यश; सिंधुदुर्गनगरीत सुविधेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः प्राथमिक शिक्षकांचे वेतन ‘जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम’द्वारे व्हावे, या प्राथमिक शिक्षक संघटनांच्या मागणीला यश आले असून आता प्राथमिक शिक्षकांचे पगार ‘झेडपीएफएमसी’द्वारे होणार आहेत. या सुविधेचा प्रारंभ आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते संगणकावर क्लिक करून करण्यात आला.
प्राथमिक शिक्षकांचे वेतन पूर्वी जिल्हा परिषदेकडून तालुकास्तरावर आणि तालुकास्तरावरील शिक्षकांच्या खात्यात जमा होत होते; मात्र काही वेळा वेतन वेळेत होत नसल्याने, तसेच वेतन होण्यास विलंब होत असल्याने वेतन ‘जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम’द्वारे व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात येत होती. अखेर ही मागणी जिल्हा परिषद प्रशासन आणि वित्त विभागाने पूर्ण केली. यासाठी वित्त विभागाने जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम ही सुविधा कार्यान्वित केली आहे. या सुविधेचा प्रारंभ आज वित्त विभागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे आता प्राथमिक शिक्षकांचे वेतन अनुदान प्राप्त होताच अवघ्या चार तासांत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या सुविधेचा ३२८३ शिक्षक, १६३ केंद्रप्रमुख आणि ८६ अतिरिक्त मुख्याध्यापकांना लाभ मिळणार आहे. ही सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी पुष्पगुच्छ, तसेच गुलाबपुष्प देऊन गौरविले. यावेळी लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, आनंद गोसावी, सिद्देश तारी, नामदेव चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86785 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..