नारळ लढविणे स्पर्धेत शैलजा खांबल विजेत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारळ लढविणे स्पर्धेत शैलजा खांबल विजेत्या
नारळ लढविणे स्पर्धेत शैलजा खांबल विजेत्या

नारळ लढविणे स्पर्धेत शैलजा खांबल विजेत्या

sakal_logo
By

42932
मसुरे ः नारळ लढविणे स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला पैठणी प्रदान करताना बंड्या खोत आदी.

नारळ लढविणे स्पर्धेमध्ये
शैलजा खांबल विजेत्या

मसुरेच्या स्पर्धेत दीडशे महिलांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : मसुरे-खोत जुवा येथील बंड्या खोत मित्रमंडळाच्या वतीने कालावल नदीकिनारी आयोजित खास महिलांसाठी नारळ लढविणे, या जिल्हास्तरीय स्पर्धेत शैलजा खांबल विजेत्या ठरल्या. सुचित्रा खांबल यांनी द्वितीय, तर शैलजा खोत अनुक्रमे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना भरजरी पैठणी, सोन्याची नथ, सेमी पैठणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
स्पर्धेत दीडशे महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. भरपावसातही स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. बक्षीस वितरणास आबा खोत, किसन मांजरेकर, दिनेश साळकर, रंजना रेडकर, मसुरेचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत, बंड्या खोत, महेंद्र खोत, साईप्रसाद खोत, प्रणय खोत, रणजित खोत, संतोष पाटील, प्रवीण खोत, अंतरा खोत, शैलजा खोत, चिंतामणी खोत, पप्पू कांदळकर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. ग्रामीण भागात अशा प्रकारची स्पर्धा भरवून जिल्ह्यातील महिलांना व्यासपीठ मिळवून दिल्याचे समाधान होत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86787 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..