देवगडमधील रस्त्यांची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमधील रस्त्यांची दुरवस्था
देवगडमधील रस्त्यांची दुरवस्था

देवगडमधील रस्त्यांची दुरवस्था

sakal_logo
By

42936
42937
देवगड ः अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रस्त्यांची झालेली चाळण.


देवगडमधील रस्त्यांची दुरवस्था

अतिवृष्टीचा फटका; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १३ ः तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. आता गणेशोत्सव जवळ येत असल्याने चाकरमान्यांची वर्दळ पाहता रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याची आवश्यकता बनली आहे. यादृष्टीने बांधकाम विभागाने हालचाली करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
पावसाळ्यात अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे चित्र आहे. पावसानंतर रस्त्याची डागडुजी होत असली तरीही पुन्हा येणाऱ्या पावसात खड्डे डोके वर काढतात. तालुक्याच्या ग्रामीण भागातील उतारावरील रस्त्यांची पावसाने चांगलीच धूप झाली आहे. सततच्या पावसाने रस्त्यात खड्डे पडले आहेत. काही भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली आहे. मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. एकाचवेळी होत असलेल्या धुवॉंधार पावसाने रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. काही भागात रस्त्यांची चांगलीच धूप झाली आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या बहुतांशी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. येत्या ३१ ला गणेश चतुर्थी उत्सव आहे. यानिमित्ताने तालुक्यात चाकरमान्यांचे आगमन होईल. अलीकडे खासगी वाहने घेऊन गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. खासगी प्रवाशी वाहतूक तसेच एसटीच्या जादा गाड्यांमधून चाकरमान्यांचे तालुक्यात आगमन होते. तसेच रेल्वेने येणारे चाकरमानी एसटीतून आपल्या गावी जातात. अशावेळी रस्त्यावरील वर्दळीत मोठी वाढ होते. वाहतूक वाढल्यानंतर खराब रस्त्यावरून वाहने हाकणे कठीण बनत असल्याचे चित्र आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्याची आवश्यकता बनली आहे. कोरोना आणि पर्यायाने झालेले लॉकडाऊन यामुळे गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना गावी येता आले नव्हते. त्यामुळे चाकरमान्यांची यावेळी गावी येण्याची अधिक आतुरता राहील. अशावेळी वर्दळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खराब रस्त्यावरून वाहने चालवताना छोट्या वाहनांना अधिक त्रास जाणवतो. त्यामुळे तूर्तास रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
................
चौकट
झाडी छाटण्याची मागणी
ग्रामीण भागातील रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा पावसाने झाडी वाढलेली आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावर समोरून येणारी वाहने चटकन दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. यातून अपघाताची शक्यताही असते. त्यासाठी वर्दळीच्या रस्त्यावरील झाडी तोडण्याची मागणीही होत आहे. बांधकाम विभागाकडील मैलकुलींची संख्या मर्यादित असल्याने यामध्ये अडचणी जाणवत असल्याचे सांगितले जाते. गणेशोत्सवापूर्वी झाडी तोडण्याची मागणी स्थानिकांची आहे.
--
कोट
तालुक्याच्या विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक भागात खड्यांनी डोके वर काढले आहे. बहुतांशी रस्ते खड्डेमय बनले आहेत. गणेश उत्सवापूर्वी रस्त्यांची तात्पुरती डागडुजी होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. गणेशमूर्ती घरी नेतानाही अडचण जाणू शकते. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे.
- श्रीकांत नाईकधुरे, माजी सरपंच, बापर्डे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86790 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..