रत्नागिरी ः तिरंगा प्यारा ः‘हर घर, हर मन तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः तिरंगा प्यारा ः‘हर घर, हर मन तिरंगा
रत्नागिरी ः तिरंगा प्यारा ः‘हर घर, हर मन तिरंगा

रत्नागिरी ः तिरंगा प्यारा ः‘हर घर, हर मन तिरंगा

sakal_logo
By

विविध भाव व्यक्त करणारी ही क्षणचित्रे
......
rat१३p६.jpg
L42953
ः १९९९ च्या कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बात्रा व त्यांच्या साथीदारांनी लडाख भागातील पॉइंट ५१४० ही पोस्ट पाकिस्तानच्या ताब्यातून हस्तगत केल्यावर तिथे तिरंगा फडकवून भारतीय सैन्यानं यश व आनंद व्यक्त केला होता.
......
rat१३p७.jpg
42954
ः सियाचिन या जगातील सर्वात उंच व अवघड युद्धभूमिवर तेथील अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत देखील तेथे तैनात असलेले आपले सैनिक तिरंगा फडवकून भारताच्या सामर्थ्याची जणू ग्वाहीच देतात.
......

......
फोटो मस्ट
rat१३p१०.jpg
42947
ः कारगिल येथील महंमद अली या तरुण रिसॉर्ट मालकाने काश्मिर खोर्‍यातील फुटिरतावादी गटाच्या धमक्यांना न जुमानता आपल्या रिसॉर्टमध्ये तिरंगा फडकवून आपल्या भारतीयत्वाची जणू प्रचितीच दिली. असा हा तिरंगा आपल्या मनात सदैव फडकत ठेवण्याचा आजच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया.
-------------
तिरंगा प्यारा ः‘हर घर, हर मन तिरंगा’

तिरंगा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज. देशाची अस्मिता, मानदंड व अभिमान. आकाशात उंच फडकणारा तिरंगा पाहून प्रत्येक भारतीयाचा ऊर भरून न आला तरच नवल. सन १९४७ पूर्वी १५० वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत असणाऱ्‍या आपल्या हिंदुस्थानला असंख्य क्रांतिकारक तसेच अहिंसेची कास धरणारे गांधीवादी कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्न व त्यागातून स्वातंत्र्य येऊ घातल्याची चाहूल लागली होती. स्वातंत्र्याच्या हस्तांतरणासंबंधीचा मसुदा व अन्य बाबी निश्‍चित करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीने २२ जुलै १९४७ ला सध्याचा तिरंग्याला स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री १२ वा. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. व्यंकय्या पिंगळी या महात्मा गांधींच्या तेलगू अनुयायाच्या कल्पनेतून साकार झालेला आपला तिरंगा ध्वज केवळ भारतभूमीतच नव्हे तर १९८४ मध्ये भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा याने अंतराळात देखील फडकावला होता. जगातील सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर आजपर्यंत ८ वेळा तिरंगा फडकवण्यात आला तर दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्टिका येथील गंगोत्री या तळावरदेखील तिरंगा फडकला हे आपणां भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. एखाद्या समुहाने कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं तर ध्वज उभारून कार्याची महती जगाला सांगण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. म्हणूनच पराक्रम, यश, ध्येयप्राप्ती, स्वातंत्र्य असे अभिमानाचे क्षण ध्वज उभारून जाहीर केले जातात. अशा प्रसंगी त्या फडकणाऱ्‍या ध्वजाच्या माध्यमातून उच्च ध्येय, आशाआकांक्षा प्रतीत होत असतात.
- संजीव बर्वे रत्नागिरी
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86822 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..