रत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करा
रत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करा

रत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करा

sakal_logo
By

टिळक जन्मस्थान स्मारकः लोगो
...
rat१३p११.jpg
42948
ः रत्नागिरी ः हिंदु जनजागृती समितीतर्फे पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांना निवेदन देताना अरविंद बारस्कर, देवेंद्र झापडेकर, माणिकराव टापरे, चंद्रशेखर गुडेकर, संजय जोशी आदी.
------------
स्मारकाची दुरावस्था; शासनाची अनास्था

हिंदू जनजागृतीने वेधले लक्ष; जतनासाठी पुरातत्त्व विभागाला साकडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करावे आणि ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे होत असतानाही देशासाठी आपल्या सर्वस्वाच्या त्याग करणाऱ्‍या लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाचे दुरवस्था झालेले स्मारक पाहावे लागत आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय? असा सवालही समितीने केला आहे.
लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान स्मारकाच्या दुरवस्थेची तातडीने दखल घेऊन त्वरित पावले उचलण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना स्मारकाच्या दुरस्थितीचे आणि जतनविषयक सुत्रांचे सविस्तर निवेदन यापूर्वी देण्यात आले होते; मात्र २८ जुलैपर्यंत स्मारकाच्या दुरवस्थेबाबतची स्थिती जैसे थे अशीच आहे. स्मारकाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ४ कोटींचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्याचे कळते; मात्र अजूनही त्याबाबत काय सुरू आहे, या विषयी माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे देवेंद्र झापडेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री माणिकराव टापरे, चंद्रशेखर गुडेकर, संजय जोशी उपस्थित होते.
-------------
चौकट
स्मारकाच्या जतनासाठी मागण्या..
जन्मस्थानाच्या देखरेखीसाठी पुरेसे कर्मचारी ठेवा
देशभरातून टिळकप्रेमी स्मारकाला भेट देण्यासाठी येतात
माहिती फलक मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेतीलही असावेत
जन्मस्थानाची वास्तू जुनी; त्याची योग्यप्रकारे दुरूस्ती व्हावी
टिळकांचे कार्य दर्शवणारी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवावी
माहिती पुस्तिका, छायाचित्र असे साहित्य ठेवण्यात यावे
लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या निवडक प्रती ठेवाव्यात
जुन्या वास्तूत लोकमान्य टिळकांविषयीच्या ग्रंथांचे ग्रंथालय उभारावे
-----------
चौकट
या संदर्भात कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे म्हणाले की, स्मारकासाठीच्या ४ कोटींच्या निधीला तत्त्वतः प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाच्या दुरुस्तीचे तपशीलवार अंदाजपत्रक आणि स्मारकाच्या परिसराचा विकास करण्यासंदर्भातील ढोबळ अंदाजपत्रक पुरातत्त्व विभाग मान्यतेसाठी पाठवले आहे. ते रत्नागिरी विभागाने राज्य पुरातत्त्व विभागाकडे पाठवले आहे. त्याला तांत्रिक मंजुरी मिळायची आहे. त्यानंतर ते वित्तीय मंजुरीसाठी पाठवले जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86836 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..