पा २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा २
पा २

पा २

sakal_logo
By

-rat१२p७.jpg
42692
राजापूर ः मनसेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्‍यांसमवेत मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव आणि पदाधिकारी.
...
प्रत्येक गावांत पक्षाचा करणार विस्तार

राजापुरातील मनसेच्या संवाद मेळाव्यात निर्धार; नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या संवाद मेळाव्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अपेक्षित असलेली पक्षबांधणी करताना घराघराँमध्ये आणि मनामनामध्ये मनसे पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार करण्यात आला. या संवाद मेळाव्याचे औचित्य साधून नवनियुक्त विविध पदाधिकाऱ्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
शहरातील नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या या संवाद मेळाव्याला मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, दत्ता दिवाळे, प्रकाश गुरव, शैलेश तांबे, पुरुर्षोत्तम खांबल, मंगेश नारकर, राजा गुरव, संजय जड्यार, पंकज पंगेरकर, आजिम जैतापकर, ज्ञानेश्वर गोंडाळ, विनायक वाडेकर, ओम ताम्हणकर आदी पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्‍यांनी मार्गदर्शन करताना घराघरामध्ये मनसे पोहचवण्याची सूचना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्‍यांना दिले. या संवाद मेळाव्याचे औचित्य साधून मंदार राणे (उपतालुकाध्यक्ष केळवली), जानव्ही धालवलकर (उपतालुकाध्यक्ष), विजय गुरव (विभाग अध्यक्ष), प्रवीण रहाटे (राजापूर कोंडेतड विभागाध्यक्ष), अमोल सोगम (भालावली विभाग अध्यक्ष), शारदा कदम (विभाग अध्यक्ष), संकल्प तांबे (धोपेश्वर उपविभाग अध्यक्ष), सचिन भोवड (देवीहसोळ उपविभाग अध्यक्ष), मुकेश सोगम (धोपेश्वर पन्हळे शाखाध्यक्ष), सागर जोगले (हर्डी शाखाध्यक्ष), महेश कोलते (ओणी शाखाध्यक्ष), सतीश चौगुले (खरवते शाखाध्यक्ष), प्रज्वला लिंगायत (महिला केळवली उपशाखाध्यक्षा), जयेश तांबे (अणसुरे वॉर्ड क्र. ३ शाखाध्यक्ष), राकेश कणेरी (अणसुरे वॉर्ड क्र. २ उपशाखाध्यक्ष), अजित प्रभुदेसाई (गटाध्यक्ष), अनिकेत भिकणे (गटाध्यक्ष) यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86852 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..