लांजा ःलोकप्रतिनिधींवर दबाव आणून काम करून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ःलोकप्रतिनिधींवर दबाव आणून काम करून घ्या
लांजा ःलोकप्रतिनिधींवर दबाव आणून काम करून घ्या

लांजा ःलोकप्रतिनिधींवर दबाव आणून काम करून घ्या

sakal_logo
By

-rat१३p३.jpg
L42921
लांजा ः संवादसभेत बोलताना गृहराज्यमंत्री अमितकुमार मिश्रा.
----------
लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे जिल्हा
योजनांना वंचितः गृहराज्यमंत्री मिश्रा
लांजा, ता. १३ ः एक जिल्हा, एक उत्पादन यासारख्या केंद्र सरकारच्या अनेक योजना संपूर्ण देशामध्ये सुरू असताना याचा लाभ आपल्या जिल्ह्याला मिळत नाही, याचा अर्थ येथील लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. अशा लोकप्रतिनिधींवर दबाव आणून काम करून घ्या, अन्यथा यापुढे अशा लोकांना मतदान करताना विचार करा, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित कुमार मिश्रा यांनी लांजा येथे केले.
लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा हे शुक्रवारी १२ ऑगस्टला लांजा येथे आयोजित वकील, डॉक्टर, व्यापारी आणि सहकारातील प्रमुख व्यक्तींशी आयोजित केलेला संवाद सभेमध्ये ते बोलत होते. या वेळी मिश्रा म्हणाले, आपल्यामध्ये येऊन आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने हे संपर्क अभियान सुरू केले आहे. आपले म्हणणे थेट सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. म्हणूनच या लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी आलो आहोत. त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा भाजप अध्यक्ष राजन तेली, शैलेंद्र दळवी, भाजप नेत्या उल्का विश्वासराव, महेश खामकर, यशवंत वाकडे, तहसीलदार प्रमोद कदम, प्रमोद कुरूप, नगरसेवक संजय यादव उपस्थित होते. वसंत घडशी यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------------------------
चौकट-
धान्य गोदामाला भेट
गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी संवादसभा संपल्यानंतर लांजा तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या धान्य गोदामाला भेट दिली व त्या ठिकाणची वस्तुस्थिती जाणून घेतली तसेच आलेल्या धान्याच्या पोत्यांमध्ये असलेले धान्यदेखील वजन करून बरोबर आहे का, याची खात्री केली.
-------------
चौकट
अधिकाऱ्यांकडून कामाची अपेक्षा
मिश्रा पुढे म्हणाले, कोविड काळात ८० कोटी जनतेला केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने मोफत धान्यपुरवठा केला तर २०० कोटी लोकांना कोविड डोस दिला आहे. हे काम केंद्र सरकारचे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी या वेळी नमूद करून केंद्र सरकारच्या विविध योजना पूर्णत्वास जात आहेत. त्या योजनांसाठी पात्र असलेल्या व्यक्तींना लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका केंद्र सरकारची आहे. अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे काम केले पाहिजे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86871 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..