रत्नागिरी ः आंबा बागायतदारांचे 24ला लाक्षणिक उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः आंबा बागायतदारांचे 24ला लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी ः आंबा बागायतदारांचे 24ला लाक्षणिक उपोषण

रत्नागिरी ः आंबा बागायतदारांचे 24ला लाक्षणिक उपोषण

sakal_logo
By

- rat१३p२७.jpg
४३०३५
- रत्नागिरी ः बागायतदार मेळाव्यात मार्गदर्शन करताना बावा साळवी.
...
खालील फोटो जागा कमी असल्यास वगळावा
-rat१३p२६.jpg
४३०३४
- पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित आंबा बागायतदार मेळाव्याला उपस्थित बागायतदार.
-----------
आंबा बागायतदार करणार लाक्षणिक उपोषण

रत्नागिरीतील मेळाव्यात ठराव; प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
रत्नागिरी, ता. १३ ः आंबा बागायतदारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दुर्लक्ष करणाऱ्‍या शासनाच्या विरोधात रत्नागिरीत २४ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण करण्याचा एकमुखी ठराव पटवर्धन हायस्कूल येथे झालेल्या मेळाव्यात बागायतदारांनी केला.
रत्नागिरीतील बागायतदारांच्या समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कोकण हापूस आंबा (उत्पादक आणि विक्रेते) सहकारी संस्था आणि ओबीसी संघर्ष समिती, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा झाला. या वेळी रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरवातीला प्रोजेक्टरच्या साहाय्याने कीटकनाशके व त्यांचा वापर, दुष्परिणाम या विषयी सविस्तर माहिती कोल्हापूरहून आलेले पाटील यांनी उपस्थितांना दिली.
गेली १५ ते २० वर्षे कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू आदी पिकांवर अस्मानी संकटे आली आहेत. बागायती, शेतीवर अशा प्रकारे नैसर्गिक संकटे झेलत असताना बागायतदारांच्या प्रश्नांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे फार मोठ्या समस्यांना बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे. बागायतदार, शेतकर्‍यांनी अडचणींचा सामना करत असताना खचून न जाता आत्मविश्वास वाढवणे महत्वाचे असल्याचे देवगडहून आलेले प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड. प्रसाद करंदीकर यांनी केले. शेतकरी चळवळीत काम करत असताना अन्यायाविरुद्ध लढताना अनेक केसेस अंगावर घेतल्या; परंतु न्याय कसा मिळाला, हे उदाहरणादाखल त्यांनी पटवून दिले. प्रकाश उर्फ बावाशेठ साळवी, नंदकुमार मोहिते, रघुवीर शेलार, मंगेश साळवी यांनी विचार मांडले. शेतकऱ्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. या मेळाव्याला बागायतदार बावशेठ साळवी, मंगेश साळवी यांच्यासह नंदुकमार मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86879 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..