दाभोळ28 हजार तिरंगा ध्वज सायंकाळी दापोलीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ28 हजार तिरंगा ध्वज सायंकाळी दापोलीत
दाभोळ28 हजार तिरंगा ध्वज सायंकाळी दापोलीत

दाभोळ28 हजार तिरंगा ध्वज सायंकाळी दापोलीत

sakal_logo
By

२८ हजार ध्वज वितरणात गोंधळ!

दापोलीत उशिरा पोचले ध्वज; शासकीय कार्यपद्धतीवर नाराजी

दाभोळ, ता. १३ ः हर घर तिरंगा या योजनेंतर्गत नागरिकांना देण्यासाठी दापोली तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींना २८ हजार तिरंगा ध्वज दापोली येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ६ वाजता आल्याने मोठा गोंधळ उडाला. यापुढे प्रत्येक ग्रामसेवक ते त्या ताब्यात देण्यासाठी पंचायत समितीत गर्दी झाली. त्यातच अनेक ध्वज सदोष निघाल्याने अनेकांनी ते ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर रात्री उशिरा गावनिहाय ध्वजांचे वाटप करण्यात आले. मात्र, शासकीय कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा प्रसार व प्रचारही करण्यात आला होता. दापोली पंचायत समितीने तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींना देण्यासाठी २८ हजार तिरंगा झेंड्यांची ऑर्डर सांगली येथे दिली होती; मात्र शुक्रवारी सकाळपासून प्रत्येक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे झेंडे नेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात ताटकळत बसले होते. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे झेंडे घेऊन येणारी गाडी दापोलीत पोचली नव्हती. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जीवात जीव नव्हता. अखेर ६ नंतर झेंडे घेऊन येणारी गाडी दापोलीत दाखल झाली असून झेंड्याचे गठ्ठे उतरवण्याचे काम सुरू झाले.
....
चौकट
अनेक ध्वज सदोष
दरम्यान, झेंड्याचे वाटप प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय करण्यात आले. मात्र, या सर्व प्रक्रियेला बराच उशीर झाला. त्यातच अनेक ध्वज सदोष होते, त्यामुळे ते वितरित करण्यात आले नाहीत. यामध्ये अनेक महिला ग्रामसेवक यांची चांगलीच अडचण होणार आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांना विचारणा केली असता, त्यांनी पुरवठादारानेच झेंडे उशिरा पोच केले असल्याचे सांगितले.
---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86880 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..