ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमांची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमांची गरज
ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमांची गरज

ध्येयप्राप्तीसाठी कठोर परिश्रमांची गरज

sakal_logo
By

43030
सावंतवाडी ः मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग उपपरिसर समाजकार्य विभागात जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.


ध्येयप्राप्तीस कठोर परिश्रमांची गरज

परशुराम गंगावणे ः सावंतवाडी उपपरिसरात आदिवासी दिन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः आयुष्यात जर निश्चित ध्येय गाठायचे असेल, तर जिद्द, चिकाटी, निर्धार आणि सातत्यपूर्ण परिश्रम ही चतुःसूत्री खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ठाकर आदिवासी कला आंगणचे ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांनी येथे केले.
येथील सिंधुदुर्ग उपपरिसरातील समाजकार्य विभागातर्फे जागतिक आदिवासी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित वारली चित्रकला पोस्टर प्रदर्शनाचे उद्‍घाटन ‘पद्मश्री’ गंगावणे यांच्या हस्ते झाले. आदिवासी दिनानिमित्त वारली चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये समाजकार्य विभागातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
यावेळी प्रा. अमर निर्मळे यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ गंगावणे यांचा सत्कार झाला. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी खास मुलाखतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला त्यांचे सुपुत्र चेतन गंगावणे उपस्थित होते. प्रा. माया रहाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पूनम गायकवाड यांनी आभार मानले. उपकेंद्राचे प्रभारी संचालक श्रीपाद वेलिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
--
उलगडला जीवनप्रवास
गंगावणे यांची मुलाखत प्रा. निर्मळे यांनी घेतली. यावेळी गंगावणे यांनी बालपणापासून ते ‘पद्मश्री’ पर्यंतचा कलाविषयक जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर ठेवला. आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी आदी कलेप्रती असणारी आपली निष्ठा आणि त्या कामातील सातत्य यामुळे आलेल्या अडचणींवर मात करून ठाकर आदिवासी लोककला केंद्राची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून सामाजिक जागृती केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86883 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..