कणकवलीत आज भाजपची रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत आज भाजपची रॅली
कणकवलीत आज भाजपची रॅली

कणकवलीत आज भाजपची रॅली

sakal_logo
By

43033
कणकवली : येथील नगरपंचायतीमध्ये रॅलीचे नियोजन करताना आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आदी.

कणकवलीत आज भाजपची रॅली
कणकवली, ता.१३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने शहरात भाजपतर्फे उद्या (ता.१४) ऑगस्ट रोजी दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. शहरातून सकाळी दहाला ही रॅली निघेल. आमदार नितेश राणे या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. याबाबतचे नियोजन आज कणकवली नगरपंचायतीमधील बैठकीत करण्यात आले.
आमदार राणे यांनी दुचाकी रॅलीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक ॲड. विराज भोसले, बाबू गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, गणेश तळगावकर, राजा पाटकर, नितीन पडावे, पप्पू पुजारे, किशोर राणे, व्यंकटेश सावंत, राजू गवाणकर, सागर राणे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात होणार असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळून कणकवली पटवर्धन चौक येथून ही रॅली बाजारपेठमार्गे पटकी देवी येथून छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणाहून नरडवे रोडवरून तहसीलदार कार्यालयाजवळ येणार आहे. लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीजवळ या दुचाकी रॅलीचा सेल्फी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा ध्वज स्तंभ कणकवलीत उभारला असून या ठिकाणी भाजपची ही रॅली भेट देणार आहे. सहभागी व्हा, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86886 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..