गुहागर ः नरवणचा अपरिचित स्वातंत्र्य सैनिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः नरवणचा अपरिचित स्वातंत्र्य सैनिक
गुहागर ः नरवणचा अपरिचित स्वातंत्र्य सैनिक

गुहागर ः नरवणचा अपरिचित स्वातंत्र्य सैनिक

sakal_logo
By

टु १
...
फोटो काल सोडला
...
-rat१३p४ .jpg
42925
ः दिनकर कानडे.
---------------------
नरवणच्या स्वातंत्र्यसैनिकाचा कोकणभूमीला विसर

दिनकर कानडेंबाबत अभ्यासक देशपांडेंची खंत; बुलढाण्यात आजही उल्लेख गौरवाने
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १३ ः तालुक्यातील नरवण गावच्या एका स्वातंत्र्यवीराचा आजही बुलढाणा शहरात उल्लेख गौरवाने केला जातो; मात्र कोकणभूमीला त्याचा विसर पडलाय. सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्य चळवळीत कार्यमग्न असणाऱ्या या स्वातंत्र्यवीराला तेथील जनतेने बुलढाण्याचे नगराध्यक्ष, कायदेमंडळाचे उपाध्यक्ष केले. दिनकर कानडे असे त्याचे नाव आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी दिली.
कानडेंनी इथे अठराविश्व दारिद्रय पाहिले. माधुकरी मागून शिक्षण घेतले. पुण्यात असताना स्वदेशसेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेऊन हा तरुण स्वातंत्र्य चळवळीत गेला. अमेरिकेत एमए झाल्यानंतर त्याची कर्मभूमी ठरली बुलढाणा. दिनकरशास्त्रींचा जन्म नरवण गावी झाला. जन्मतारीख उपलब्ध नाही; मात्र त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात मे १८८६ ला लिहिलेले आहे. त्यांचे वडील भिक्षुक होते. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. प्राथमिक अक्षरओळख झाल्यानंतर गुहागर आणि नंतर मुंबईला चौथीपर्यंत शिकले. १८९६ ला प्लेगची साथ आल्याने मुंबई सोडून पुन्हा नरवणला यावे लागले. थोड्याच दिवसांत आईचे नवज्वराने निधन झाले. लहान वयातच वडिलांनी घरातून बाहेर काढले. शेवटी एका परिचित गृहस्थांनी त्यांना चिपळूणला पाठवले.
चिपळूणला त्यांचे काका न्यायालयात नाझर होते. काकांनी नाइलाजाने ठेवून घेतले. दिनकरला इंग्रजी शिकायचे होते; मात्र काकांनी मराठी शाळेत घातले. दिनकरने गावातील शंकराच्या देवळात सवंगड्यासमवेत लहानसा सार्वजनिक गणेशोत्सव केला. या उत्सवात स्वतः लिहिलेल्या ''उद्योगधंद्यांचे महत्व'' हा निबंध समोर जमलेल्या १७-१८ श्रोत्यांसमोर वाचला. सार्वजनिक जीवनातले पहिले व्याख्यान चिपळूणच्या शाळेत झाले. इंग्रजी शिकायचे, म्हणून रत्नागिरीला गेले. माधुकरी मागून शिकू लागले. तिथून पुण्याला गेले. त्या शाळेत एक वर्षात दोन-तीन इयत्तांचा अभ्यास करून घेत. ही शाळा राष्ट्रीय विचारांची होती.
व्याख्याने देण्यावरही गंडांतर आले. अखेर निदान धार्मिक प्रवचनातून देशकार्य करता येईल, त्यासाठी धर्म शिक्षण हवे, म्हणून ते वाईला केवलानंद सरस्वतींच्या प्रज्ञापाठ शाळेत शिकायला गेले. तिथे १९१४ पर्यंत राहिले. या शिक्षणामुळेच दिनकर लक्ष्मण कानडे हे दिनकरशास्त्री कानडे झाले. याच प्रज्ञापाठशाळेत त्यांच्यासमवेत शिक्षण घेणारे होते, आचार्य विनोबाजी, अशी माहिती देशपांडे यानी दिली.
---------------------------
चौकट
कानडेंची आठवण म्हणून वाचनालय
नरवणमध्ये (कै.) दिनकरशास्त्री कानडे यांची आठवण म्हणून डॉ. अनिल जोशी यांच्या प्रयत्नातून वाचनालय सुरू आहे. नरवण ग्रामपंचायतीनेही दिनकरशास्त्रींचा परिचय ग्रामस्थांना होण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन केले होते.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86888 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..