रत्नागिरी ः समुद्रातही फडकला तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः समुद्रातही फडकला तिरंगा
रत्नागिरी ः समुद्रातही फडकला तिरंगा

रत्नागिरी ः समुद्रातही फडकला तिरंगा

sakal_logo
By

-rat१३p२४.jpg,
४२९८६

rat१३p२५.jpg
४२९८७
- रत्नागिरी ः मच्छीमारांनी जयगड ते पडवे समुद्रातून काढलेली नौकांची तिरंगा फेरी.
-------------
समुद्रात करंट तरी फडकला तिरंगा

आझादी का अमृत महोत्सवात ७५ मच्छीमारी नौकांचा सहभाग; मच्छीमार भारावले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः हलका वारा, अधुनमधून पडणाऱ्‍या जोरदार सरी यांची पर्वा न करता गुहागर तालुक्यातील पडवे, नवानगरसह आजुबाजूच्या परिसरातील ७५ मच्छीमारांनी नौकांमधून हर घर तिरंगा मोहीम यशस्वीतेसाठी समुद्रामध्ये पडवे ते जयगड अशी रॅली काढली. प्रत्येक नौकेवर तिरंगा फडकवण्यात आला होता. देशभक्तीपर गीतेही प्रत्येक नौकेवर लावण्यात आली होती. त्यामुळे मच्छीमारही भारावून गेले होते.
आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी दुचाकी, चारचाकी रॅलींसह पदयात्रा काढल्या जात आहे. हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान, देशप्रेम याला अनुसरून रत्नागिरीतील मच्छीमारांची समुद्रामध्ये नौकांद्वारे रॅली काढण्याचा निर्णय मत्स्य विभागाकडून घेण्यात आला होता. त्याला गुहागर तालुक्यातील मच्छीमारांनी प्रतिसाद दिला. ७५ नौका सायंकाळी पडवे येथून एका रांगेत जयगडच्या दिशेने रवाना झाल्या. एका पाठोपाठ एक अशा नौकांचा ताफा समुद्रामधून पुढे सरकत होता. देशभक्ती जागृत करणारी गाणी प्रत्येक नौकेवर लावण्यात आली होती. पाऊस आणि वाऱ्‍यामुळे वातावरणही बिघडलेले आहे. पाण्यालाही थोडा करंट होता. याही परिस्थितीमध्ये मच्छीमारांनी पडवे ते जयगड आणि तेथून पुन्हा पडवे बंदरात अशी फेरी मारली. सुमारे दीड तासाच्या या उपक्रमामुळे मच्छीमारी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पडवे येथे शनिवारी (ता. १२) दुपारी रॅलीला आरंभ झाला. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय एन. व्ही. भादुले मार्गदर्शनाखाली प्रत्येक नौकेवर तिरंगा लावण्यात आला होता.
उद्घाटन कार्यक्रमाला भादुले यांच्यासह गुहागर पोलिस निरीक्षक पाचपुते, परवाना अधिकारी देसाई, उत्कर्षा कीर, पडवे सरपंच व आदर्श मच्छीमार संस्थेचे चेअरमन मुजीब जांभारकर, मुदसर खळे, मकबूल जांभारकर, मुस्तर खळे, नजीर जांभारकर, सागर सुरक्षारक्षक स्वप्नील झिंगे, साईनाथ साळवी यांच्यासह मच्छीमार उपस्थित होते.
-----------
कोट
मत्स्य विभाग आणि पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद पडवे, नवानगरसह आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमारांनी स्वतःच्या नौका घेऊन रॅली यशस्वी केली. यामधून एकजुटीचे दर्शन घडवून आणले.
- एन. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य आयुक्त
..
एक नजर..
७५ नौका पडवे येथून एका रांगेत जयगडकडे रवाना
प्रत्येक नौकेवर देशभक्ती जागृत करणारी गाणी
पाऊस, वाऱ्‍यामुळे वातावरणही बिघडले; पाण्यालाही करंट
पडवे ते जयगड आणि तेथून पुन्हा पडवे बंदरात अशी फेरी
दीड तासाच्या या उपक्रमामुळे मच्छीमारी बांधवांमध्ये उत्साह

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86901 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..