गावतळे-तिरंगा फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावतळे-तिरंगा फेरी
गावतळे-तिरंगा फेरी

गावतळे-तिरंगा फेरी

sakal_logo
By

पा २
....
सर्व फोटो काल सोडले
...
-rat१३p१. jpg
L42919
ः गावतळे येथील बुटाला हायस्कूल येथे माजी सैनिक जितेंद्र पवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
---------------
गावतळे हायस्कूलमध्ये जागृती फेरी
गावतळे ः हर घर तिरंगांतर्गत तिसरी जनजागृती फेरी श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज गावतळे व ग्रामपंचायत गावतळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.११) काढण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी तिरंगा वेशभूषा साकारली होती. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक होरे, गावतळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जालगावकर, राजू पवार, सावंत व सर्व शिक्षक उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना गावतळेतील उद्योजक राजेश जाधव, विकास म्हाब्दी, विजय खेतले यांनी खाऊचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रात्यक्षिक सादर करत उत्साहात फेरी साजरी केली.
-----------------
बुटाला हायस्कूल येथे ध्वजारोहण
गावतळे ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १३) श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल गावतळे विद्यालय प्रांगणात गावचे सुपुत्र व माजी सैनिक नायब सुबेदार जितेंद्र पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. संतोष पवार, सुधीर खेतले, डॉ. मुकादम, नंदकुमार कालेकर व अनुसया सावंत यांनी विद्यार्थ्यांना गणवेश दिले. डॉ. कासारे यांनी शाळेला वजनकाटा भेट दिला. या वेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक होरे, सर्व शिक्षकवृंद, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पवार, सुरेश पवार, घुगे, बाचापाळे, मानेभाऊ आदी मंडळींची उपस्थित होती.
---------

-------------
ratchl१३३.jp
43047
ः चिपळूण ः तिरंगा बाईक रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी, शिक्षक, संस्था पदाधिकारी व नागरिक.
--------------
पेढांबेत तिरंगा बाईक रॅली
चिपळूण ः तालुक्यातील पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीतील सर्व शैक्षणिक शाखांनी हर घर तिरंगा या कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी शनिवारी (ता. १३) तिरंगा बाईक रॅली काढली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इथून शनिवारी सकाळी १० वाजता या रॅलीला सुरवात झाली. चिंचनाका, पॉवरहाऊस, काविळतळी, बहादूरशेखनाका, खेर्डी, सती, पिंपळी, मुंढे, शिरगाव, अलोरे, मंदार एज्युकेशन सोसायटी अशी भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये संस्थेच्या व्हाईस चेअरमन शैलजा राजाराम शिंदे, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास सावंत, विश्‍वस्त व प्राचार्या डॉ. वेदांती सावंत, संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बाईक घेऊन सहभागी झाले होते. अलोरे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी रॅलीच्या समारोपाला उपस्थित राहून उपस्थितांना आझादी का अमृत महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86904 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..