सावंतवाडी पोलिसांची जनजागृती फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी पोलिसांची जनजागृती फेरी
सावंतवाडी पोलिसांची जनजागृती फेरी

सावंतवाडी पोलिसांची जनजागृती फेरी

sakal_logo
By

43067
सावंतवाडी ः पोलिसांच्यावतीने काढलेली जनजागृती फेरी.

सावंतवाडीत पोलिसांनी
काढली जनजागृती फेरी
सावंतवाडी ः येथील पोलिस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त शहरात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत येथील मिलाग्रीस हायस्कूलमधील विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी पोलिस निरीक्षक शंकर कोरे, पोलिस उपनिरीक्षक बाबू तेली, अमित गोते, आनंद यशवंते, प्रसाद कदम, महेश जाधव, अमित राऊळ, वाहतूक पोलिस राजा राणे, सुनील नाईक, रामचंद्र साटेलकर, गुरुनाथ भागवत आदींसह शिक्षक सहभागी उपस्थित होते. येथील मिलाग्रिस हायस्कूलकडून फेरीचा प्रारंभ करण्यात आला. एसपीके कॉलेज, रामेश्वर प्लाझा, पालिका असा प्रवास करत ही फेरी गांधीचौक व तेथून पुन्हा माघारी परतली.
...........
बांद्यात १९ला नियोजन बैठक
बांदा ः गणेश चतुर्थीचे वाहतूक व बाजारपेठेचे नियोजन करण्यासाठी पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन व व्यापारी संघ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन १९ ला ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले आहे. दरवर्षी बांदा शहरात गणेश चतुर्थीपूर्वी नियोजन करण्यात येते. बांदा ही आजूबाजूच्या ३५ ते ४० गावांची बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86922 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..