‘तिरंग्या’प्रती एकनिष्ठता दाखवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तिरंग्या’प्रती एकनिष्ठता दाखवा
‘तिरंग्या’प्रती एकनिष्ठता दाखवा

‘तिरंग्या’प्रती एकनिष्ठता दाखवा

sakal_logo
By

43068
सावंतवाडी ः मुलांना खाऊ वाटप करताना सुनील राऊळ व अन्य.


‘तिरंग्या’प्रती एकनिष्ठता दाखवा

सुनील राऊळ ः सावंतवाडीत सैनिक पतसंस्थेतर्फे विविध उपक्रम

सावंतवाडी, ता. १३ ः देशप्रेम प्रत्येकाच्या मनामध्ये आणि घराघरांमध्ये पोहोचले पाहिजे, या उद्देशाने ''हर घर तिरंगा''चे आयोजन केले आहे. आमचा तिरंगा हा आमचा स्वाभिमान आहे. देश एकसंघ राहण्यासाठी तिरंग्याप्रती एकनिष्ठता दाखवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांनी आपल्या मनामध्ये देशप्रेम आणि राष्ट्रप्रेम बाळगावा, असे आवाहन सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी केले. ते माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ मध्ये आयोजित सामाजिक उपक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी उत्सवानिमित्त पतसंस्थेच्या वतीने प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना खाऊ वाटप करण्याचा उपक्रम श्री. राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर वंजारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर, उपशिक्षिका चैताली गवस, भक्ती फाले, उपशिक्षक राजेश जाधव, महेश लंबे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गावडे, शाखाधिकारी प्रल्हाद तावडे, विठ्ठल बिड्ये, शिक्षक पालक माता संघाचे पदाधिकारी सौ. भंडारी, सुलोचना पाटील, स्नेहा पटेल, पूजा दळवी, विशाल पवार, गणेश मिसाळ, विधाता पोकळे, रेषा सावंत आदींसह पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सैनिक पतसंस्थेने ज्या गावांमध्ये, ज्या भागांमध्ये पतसंस्थेच्या शाखा आहेत, तेथील प्राथमिक शाळेमध्ये जाऊन शाळेतील मुलांना खाऊ वाटपाचा उपक्रम राबविल्याचे श्री. राऊळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेची पाहणी केली. सुरुवातीचे पतसंस्थेचे मुख्य कार्यालय या माठेवाडा भागात असल्यामुळे या शाळेबद्दल आमच्या मनामध्ये आदराचे स्थान आहे, असे सांगत या स्वच्छ, सुंदर शाळेने आपली गुणवत्ता कायम ठेवल्याबद्दल कौतुकोद्गार काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86923 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..