योजनांमधील अडचणी दूर करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योजनांमधील अडचणी दूर करू
योजनांमधील अडचणी दूर करू

योजनांमधील अडचणी दूर करू

sakal_logo
By

43094
सिंधुदुर्गनगरी ः येथील मेळाव्यात मार्गदर्शन करताना अजय कुमार मिश्रा. सोबत शैलेंद्र दळवी, राजन तेली, प्रमोद जठार आदी.

योजनांमधील अडचणी दूर करू

अजय कुमार मिश्रा ः सिंधुदुर्गनगरीत लाभार्थ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी विविध योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्यांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी ओरोस येथे पार पडलेल्या मेळाव्यात केले. पुढच्या दौऱ्यामध्ये आपण जिल्हाधिकारी आणि त्यांच्या खात्याचे संबंधित अधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन या योजनांमधील अडचणी दूर करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी देशभरातील १४४ लोकसभा मतदारसंघात ‘लोकसभा प्रवास योजना’ हे अभियान राबवित आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ स्वबळावर जिंकण्याची तयारी भाजपने या अभियानाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा हे तीन दिवसांच्या लोकसभा क्षेत्र दौऱ्यावर आलेले आहेत. त्याअंतर्गत केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा आज ओरोस येथील इच्छापूर्ती सभागृहात झाला. या मेळाव्यामध्ये मंत्री मिश्रा यांनी केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या.
या मेळाव्यामध्ये या अभियानाचे लोकसभा क्षेत्र संयोजक अतुल काळसेकर यांनी सर्व योजनांचा आढावा मांडला. यावेळी व्यासपीठावर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, सरचिटणीस प्रभाकर सावंत, अशोक सावंत, संध्या तेरसे, भाई सावंत, रणजित देसाई, संजु परब, धोंडी चिंदरकर, विनायक राणे, दादा साईल, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील, महेश मांजरेकर, देवेन सामंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक या मेळाव्याचे प्रमुख आनंद उर्फ भाई सावंत यांनी केले.
--
चौकट
मोदींचे लाभार्थ्यांनी मानले आभार
यावेळी विविध योजनांच्या लाभार्थींनी मिळत असलेल्या योजनेतून आपल्या जीवनामध्ये कोणता सकारात्मक फरक पडला, याची माहिती देत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचत असल्याने फायदा झाला, असे नमूद केले. यावेळी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करणारी अनेक अभिनंदन पत्रे देखील मंत्री मिश्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86940 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..