रत्नागिरी-स्त्री वेषात दुकान फोडणारे नागरिकांहाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-स्त्री वेषात दुकान फोडणारे नागरिकांहाती
रत्नागिरी-स्त्री वेषात दुकान फोडणारे नागरिकांहाती

रत्नागिरी-स्त्री वेषात दुकान फोडणारे नागरिकांहाती

sakal_logo
By

-rat13p31.jpg
43082
रत्नागिरी ः शहरातील आठवडा बाजार येथील एस. एस. मोबाईल शॉपीत चोरीच्या घटनेचा पंचनामा करताना शहर पोलिस.
------------

स्त्री वेशात मोबाईल शॉपी
फोडणाऱ्यांना नागरिकांनी पकडले

एकटा ताब्यात, दुसरा पळाला; ५ लाखांच्या मालावर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : स्त्री वेश परिधान करून शहरातील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोघां भुरट्या चोरट्यांना रत्नागिरीतील जागरुक नागरिकांनी रंगेहाथ पकडले. दुकानाचे शटर उचकटून चोरी करत असताना नागरिकांनी पकडून एकाला पोलिसांच्या स्वाधीन केले; मात्र दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यांनी ५ लाख २ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल चोरला असून, शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (ता. १३) पहाटे शहरातील आठवडा बाजार येथे ही चोरीची घटना उघडकीस आली. संकेश्वर आर्केडमधील एस. एस. मोबाईल शॉपीचे दुकान आहे. पहाटे दोनच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसले. संशयावरून त्यांनी बघितले असता, दोन चोरटे चोरी करत असल्याचे दिसले. या घटनेच्या काहीवेळ अगोदर एका रिक्षा चालकाला दोन संशयित व्यक्ती आठवडा बाजारात फिरताना दिसल्या. या रिक्षा चालकाने ही बाब गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सांगितली. ही माहिती मिळताच पोलिस आठवडा बाजार येथे पोचले. याचवेळी जमलेल्या नागरिकांनी दोन चोरट्यांना पकडून ठेवले होते. मात्र यातील एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. दुसऱ्या चोरट्याने महिलांचा गाऊन घातला होता व तोंड पिशवीने झाकले होते. दुकानाचे मालक अमोल डोंगरे यांना पोलिसांनी बोलावून घेतले व दुकानातील माल तपासायला सांगितला.
या दरम्यान दुसऱ्या चोरट्याने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. घटनास्थळी तोडलेले कुलूप होते व शटर उचकटण्यासाठी वापरलेली लोखंडी पार देखील मिळाली. दुकानात शिरताना चोरट्यांनी काच देखील फोडली होती. एका गोणीत लाखो रुपये किमतीचे महागडे न हॅण्डसेट भरून पळण्याचा या चोरट्यांचा डाव होता. मात्र नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला. दुसऱ्या चोरट्याने पळताना काही वस्तू नेल्या का, हे तपासण्यासाठी आता दुकानातील माल तपासण्याचे काम सुरू आहे. एका चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
नूरमहमद दिलमहमद खान (वय २२, रा. मच्छीमार्केट, रत्नागिरी) व आलम वागळे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी या संशयित चोरट्यांची नावे आहेत. चोरट्यांनी ८९ हजार ९९० रुपयांच्या आयफोनसह मोबाईल अॅक्सेसरीज व मोबाईल अशा ५ लाख २ हजार २८४ रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या प्रकरणी डोंगरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. भोसले करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86947 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..