चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद
चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद

चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद

sakal_logo
By

चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरीत आयोजन ः ''स्वराज्य महोत्सव'' उपक्रमांतर्गत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घेण्यात येत असलेल्या स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेली ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.
चित्रकला स्पर्धेत ९३, निबंध स्पर्धेत ९६ तर वक्तृत्व स्पर्धेत ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजयी स्पर्धकांचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, प्रशासक प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, शिक्षणाधिकारी डॉ. मुस्ताक शेख यांनी अभिनंदन केले
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकानुसार असा
चित्रकला स्पर्धा-पहिली ते चौथी गट- श्रावणी धुरी (आंबोली मुळवंद - सावंतवाडी), शिवम आमडोसकर (वागदे डगळवाडी कणकवली), श्रेया राऊत (खारेपाटण हसोळटेंब कणकवली). पाचवी ते सातवी गट-हर्षिता देवरुखकर (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), कल्पक कोकरे (माध्यमिक विद्यामंदिर पडेल), अनुश्री राणे (एसएम हायस्कूल कणकवली). आठवी ते दहावी गट-ऋतुजा म्हाडगुत (राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी), पार्थ मेस्त्री (भंडारी हायस्कूल मालवण), रिया कांबळे (माध्यमिक विद्यालय पडेल). अकरावी ते बारावी गट-मिहिर कदम (जांभवडे हायस्कूल), आयुष पेडणेकर (ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट), मानसी करलकर (टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय मालवण).
निबंध स्पर्धाः पहिली ते चौथी गट-भार्गवी आळवे (वराड देवूळवाडी, मालवण), विराज कोदले (साळशी नंबर १ सावंतवाडी), स्वरा बांदेकर (भंडारी प्राथमिक शाळा मालवण). पाचवी ते सातवी गट-समीक्षा कुणकेरकर (कुणकेरी नंबर १ सावंतवाडी), रिया मेस्त्री (कोटकामते नंबर १, देवगड), वैशाली गोवेकर (वजराट देवसू, वेंगुर्ले). आठवी ते दहावी गट-श्रेया शेळके (आचिर्णे हायस्कूल, वैभववाडी), चिन्मया ठाकूर (शेठ म. ग. हायस्कूल देवगड), श्रावणी तेली (शिवडाव हायस्कूल कणकवली). अकरावी ते बारावी गट-प्रीती परब (ज्युनिअर कॉलेज कळसुली कणकवली), मानसी करलकर (टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय मालवण), संजना धुमक (वाडोस हायस्कूल कुडाळ).

वक्तृत्व स्पर्धा ः पहिली ते चौथी-नील बांदेकर (बांदा नंबर १ सावंतवाडी), विराज पाटील (शिराळे नंबर १ वैभववाडी), संचिता पाटील (ओटव ओटववाडी कणकवली). पाचवी ते सातवी गट-ध्रुवी भाट (वराडकर हायस्कूल कट्टा, मालवण), सुखद फडके (कवठी नंबर १ कुडाळ), साक्षी दळवी (वजराट नंबर १ वेंगुर्ले). आठवी ते दहावी गट-खुशी गावणेर (माध्यमिक विद्यालय हेत वैभववाडी), सौम्या मणेरकर (न्यू इंग्लिश स्कूल भेडशी दोडामार्ग), चंदना पावसकर (चेंदवण हायस्कूल कुडाळ). अकरावी ते बारावी गट-श्रद्धा मडव (जांभवडे हायस्कूल कुडाळ), भक्ती पाटील (कै. हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी), हिंदवी गावकर (ज्युनिअर कॉलेज कनेडी कणकवली).
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86956 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..