केसरकरांचे दोडामार्गात जल्लोषी स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांचे दोडामार्गात जल्लोषी स्वागत
केसरकरांचे दोडामार्गात जल्लोषी स्वागत

केसरकरांचे दोडामार्गात जल्लोषी स्वागत

sakal_logo
By

43104
केंद्रे : येथे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांचे चाफ्याचे झाड भेट देऊन स्वागत करताना आयनोडे हेवाळेच्या सरपंच साक्षी देसाई.

कॅबिनेट मंत्री केसरकरांचे
केंद्रे येथे जल्लोषी स्वागत
साटेली-भेडशी, ता.१३ ः कॅबिनेट मंत्री म्हणून पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या दीपक केसरकर यांचे कोल्हापूरहून येताना दोडामार्ग तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रे पुनर्वसन वसाहतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हा दौऱ्याची सुरवात त्यांनी तालुक्यातील अगदी टोकाच्या गावातून केली. आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.
मंत्री केसरकर यांनी दौऱ्याची सुरवात वीजघर येथील केंद्रे पुनर्वसन वसाहतीपासून केली. आयनोडे-हेवाळे गाव आणि केंद्रे पुनर्वसन वसाहतीत मंत्री केसरकर यांनी यापूर्वी अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल तेथील गावकऱ्यांमध्ये आदर आहे. त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावरही त्यांच्यावरील प्रेम कायम असल्याचे आजच्या दौऱ्यावेळी दिसले. यावेळी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, गणेशप्रसाद गवस, राजेश गवस, राजू निंबाळकर, प्रेमानंद देसाई, रामदास मेस्त्री, केंद्रे प्रकल्पग्रस्त, दत्ताराम देसाई, आयनोडे-हेवाळे ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, कसई-दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण आदींनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86965 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..