नुकसान भरपाईबाबत उद्या सावंतवाडीत उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान भरपाईबाबत
उद्या सावंतवाडीत उपोषण
नुकसान भरपाईबाबत उद्या सावंतवाडीत उपोषण

नुकसान भरपाईबाबत उद्या सावंतवाडीत उपोषण

sakal_logo
By

नुकसान भरपाईबाबत
उद्या सावंतवाडीत उपोषण
बांदा, ता. १३ ः जुलै २०२१ मधील पूरग्रस्तांना अद्यापपर्यंत शासकीय नुकसान भरपाई न मिळाल्याने सोमवारी (ता. १५) सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय शेर्ले येथील पूरबाधित ग्रामस्थ तथा वंचित बहुजन आघाडीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, २१ जुलै २०२१ रोजी बांदा शहरात पूर येऊन नागरिक, व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे केले. काही जणांना भरपाई देखील देण्यात आली; मात्र निधी नसल्याचे कारण देत अद्यापपर्यंत भरपाई देण्यात आलेली नाही. यासंदर्भात २६ जानेवारीला उपोषण केले होते. मात्र शासनाने आश्वासने देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पूरग्रस्तांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे. गणेश चतुर्थी सण तोंडावर आल्याने १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86997 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..