सं १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं १
सं १

सं १

sakal_logo
By

रत्नागिरीत भगिनींसाठी झिम्मा-फुगडी स्पर्धा

रत्नागिरी ः ‘श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान’ व ‘श्रीराम मंदिर संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ऑगस्टला दुपारी १ ते सायंकाळी ७ या वेळात शहरातील रामआळी येथील श्रीराम मंदिरात जिल्ह्यातील खास भगिनींसाठी झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांना व मंडळांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत भगिनींनी वैयक्तिक किंवा भगिनींचे मंडळ सहभागी होऊ शकते. त्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही. या स्पर्धेत फुगडीचे विविध प्रकार (साधी फुगडी, गोळण फुगडी, दंड फुगडी, लाटणी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिकुट फुगडी, चौकट फुगडी, चक्र फुगडी, सरकती फुगडी, उठबस फुगडी, कांडण फुगडी, बस फुगडी), मंगळागौर जागर आदी सादर करता येतील. फुगडी, नृत्य व उखाणे त्याचप्रमाणे या स्पर्धेत झिम्मा फुगडीची गाणी, झिम्मा नृत्य, उखाणे घेणे, झिम्मा फुगडीचे विविध प्रकार एकेरी फुगडी, दुहेरी फुगडी, समूह फुगडी आपल्या सोयीनुसार व आवडीनुसार स्पर्धक सादर करू शकतात. झिम्मा फुगडीतील समन्वय, गीते, मुद्राभिनय, संगीत व वेषभूषा आदी बाबींचा विचार परीक्षक मंडळाकडून केला जाईल. नावनोंदणीसाठी सुनील नलावडे, सरचिटणीस, श्रीराम मंदिर कार्यालय, मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86999 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..