कणकवली : सक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : सक्षिप्त
कणकवली : सक्षिप्त

कणकवली : सक्षिप्त

sakal_logo
By

कनेडी हायस्कूलतर्फे वृक्षारोपण
कनेडी ः येथील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ७५ रायवळ आंबा रोप लागवड केली जाणार आहे. कनेडी ते फोंडा या राज्य महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा उपक्रम उद्या (ता.१५) स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता होणार आहे. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते या ७५ वृक्ष रोप लागवडीचा उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूल येथे ध्वजवंदन आणि विद्यार्थ्यात्यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
----------
भिरवंडे रामेश्वर मंदिरात कीर्तन
कनेडी ः भिरवंडे रामेश्वर मंदिरात श्रावणसोमवारी विविध धार्मीक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता.१५) मंदिरात लघुरूद्र होणार आहे. याचे औचित्यसाधुन दुपारी एक वाजता खांबाळे येथील ज्ञानेश्वर माऊल मंडळाचा हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद आणि दुपारी अडीच वाजता मालवण अजगणी येथील कीर्तनकार ह.भ.प.कु.मृणाल मिलिंद गांवकर ही तरूणी मार्कन्डेय अवतार या विषयावर किर्तन सादर करणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवालये संचालक मंडळ आणि भिरवंडे ग्रामस्थांच्यावीतने करण्यात आल आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87050 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..