कणकवली :एसटी परिसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :एसटी परिसर
कणकवली :एसटी परिसर

कणकवली :एसटी परिसर

sakal_logo
By

L४३१५१
कणकवली ः येथील एसटी बस स्थानकात खड्ड्याचे साम्राज्य
--
कणकवली बस स्थानकात जागोजागी खड्डे
कणकवली,ता. १४ ः येथील एसटी बस स्थानकाच्या परिसरात जागोजागी खड्डे पडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्थानकात आल्यानंतर प्रवाशांना खड्ड्यातूनच चालावे लागत आहे. अशा वेळी एसटी बस गाड्या धावत असल्याने प्रवाशांच्या अंगावर चिखल उडत आहे. मध्यंतरी जांभळ्या दगडाने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा या परिसरात खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे. सध्या श्रावण मास आणि आगामी काळातील गणेशउत्सव यामुळे शहरात खरेदीला येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील विविध गावातून शेकडो प्रवाशी येथील बस स्थानकात ये-जा करतात. अशा प्रवाशांना या खड्यांचा नाहक त्रास सहन करावाला आहे. हे खड्डे गणेशउत्सवापूर्वी भरावेत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87052 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..