वैभववाडीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद
वैभववाडीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद

वैभववाडीत निबंध स्पर्धेला प्रतिसाद

sakal_logo
By

निबंध स्पर्धेला वैभववाडीत प्रतिसाद
निकाल जाहीर ः रावराणे महाविद्यालयात आज बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा,
वैभववाडी, ता. १४ः हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त चार गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत तेजस्वी रावराणे, वैष्णवी तळेकर, मनाली इस्वलकर, शिवानी फुटक हे विद्यार्थी प्रथम आले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उद्या (ता. १५) सकाळी १० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात होणार आहे.
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनी ७ ला सडुरे येथे स्मृतीजागराचे आयोजन केले होते. याशिवाय विविध उपक्रम देखील तालुक्यात राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि मेजर कौस्तुभ रावराणे मित्रमंडळाच्या माध्यमातून तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. एकूण २०० हुन अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग दर्शविला.
स्पर्धेचे परीक्षण आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नामदेव गवळी आणि प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. स्पर्धेचा निकाल प्रथम तीन क्रमांकानुसार असाः पाचवी ते सातवी (अ) गट- शिवानी फुटक, किरण कोलते, दुर्वांक शेळके, उत्तेजनार्थ-रिया चव्हाण, भार्गवी रावराणे. आठवी ते दहावी (ब) गट- मनाली इस्वलकर, अर्चिता दळवी, तृतीय श्रेया शेळके, उत्तेजनार्थ तनिष्का खानविलकर, दत्तप्रसाद जावडेकर. अकरावी ते बारावी (क) गट- वैष्णवी तळेकर, मनस्वी शिंदे, अस्मिता राणे, उत्तेजनार्थ प्रतीक्षा राणे. महाविद्यालयीन (ड) गट-तेजस्वी रावराणे, प्रतीक्षा घुगरे, प्रणाली पांचाळ, उत्तेजनार्थ निकिता चव्हाण. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्य़ास विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा आयोजक समितीचे प्रतिनिधी सागर रावराणे आणि प्रकाश काळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87091 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..