कट्टा हायस्कूल, सिंधुदुर्ग महाविद्यालय प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कट्टा हायस्कूल, सिंधुदुर्ग महाविद्यालय प्रथम
कट्टा हायस्कूल, सिंधुदुर्ग महाविद्यालय प्रथम

कट्टा हायस्कूल, सिंधुदुर्ग महाविद्यालय प्रथम

sakal_logo
By

L४३१९५

ओळ - मालवण ः देशभक्तीपर समूह गीतगायनातील विजेत्या सिंधुदुर्ग महाविद्यालयास तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. (छायाचित्र ः गणेश गावकर)

कट्टा हायस्कूल, सिंधुदुर्ग महाविद्यालय प्रथम
देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा ः ''आस्था''तर्फे मालवणात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ ः स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आस्था ग्रुपच्यावतीने आयोजित केलेल्या देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेत शालेय गटात वराडकर हायस्कूल कट्टाने, तर महाविद्यालयीन गटात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत शालेय गटात प्राथमिक कन्याशाळा (द्वितीय), ओझर विद्यामंदिर कांदळगाव (तृतीय), टोपीवाला हायस्कूल (उत्तेजनार्थ) यांनी क्रमांक प्राप्त केले. महाविद्यालयीन गटात वराडकर हायस्कूल ज्युनियर कॉलेजने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी संघाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास तहसीलदार अजय पाटणे, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, परीक्षक मेघना जोशी, संजय शिंदे, प्राथमिक रेवतळे शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी देशमुख, सहाय्यक शिक्षिका सौ. गवस, सौगंधराज बादेकर, हरी चव्हाण, मनोज चव्हाण, बंटी केनवडेकर, भाऊ सामंत, प्रशांत हिंदळेकर, मिथिलेश मिठबावकर, आगोस्तीन डिसोझा, कुणाल मांजरेकर, संग्राम कासले, अमित खोत, कृष्णा ढोलम, ललित चव्हाण, महेश कदम आदी उपस्थित होते.
सौ. जोशी यांनी समूहगीत स्पर्धेत सहभागी शाळांच्या स्पर्धकांनी सादरीकरण उत्तमरित्या केले. ज्या स्पर्धकाचे सादरीकरण प्रभावी होते, त्यांना क्रमांक प्राप्त झाला; परंतु सहभागी स्पर्धकांनी निराश होऊ नये. स्पर्धेमध्ये क्रमांकासह त्यात सहभागी होऊन कला सादर करणे देखील महत्त्वाचे आहे, असे सांगितले. तहसीलदार पाटणे यांनी आस्था ग्रुपने कोविड कालावधीत गरजू नागरिकांची गरज लक्षात घेऊन अन्नदानाची सोय केली. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. समूहगीत स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आस्था ग्रुपने केल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक हरी चव्हाण यांनी, सूत्रसंचालन संग्राम कासले, सौगंधराज बांदेकर यांनी केले. उमेश मांजरेकर यांनी आभार मानले.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87092 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..