सावंतवाडी लोकअदालतीत 68 प्रकरणांचा निपटारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी लोकअदालतीत 
68 प्रकरणांचा निपटारा
सावंतवाडी लोकअदालतीत 68 प्रकरणांचा निपटारा

सावंतवाडी लोकअदालतीत 68 प्रकरणांचा निपटारा

sakal_logo
By

L43187

ओळ - सावंतवाडी ः राष्ट्रीय लोकअदालतीच्या प्रारंभप्रसंगी दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर व अन्य.

सावंतवाडी लोकअदालतीत
६८ प्रकरणांचा निपटारा
सावंतवाडी ः सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६८ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून ९ लाख ५८ हजार ५१९ रुपये वसूल करण्यात आले. एकूण १२९७ प्रकरणे ठेवण्यात आली होती.
न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर, सहदिवाणी न्यायाधीश डी. बी. सुतार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकअदालत झाली. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. पी. डी. देसाई, पॅनेल समिती सदस्य अॅड. प्रिया गावकर-भावे, अॅड. वेदिका राऊळ, अॅड. स्वप्निल कोलगावकर उपस्थित होते. वादपूर्व प्रकरणे ७४७ ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३९ प्रकरणे निकाली होऊन १ लाख ६७ हजार ३०५ रुपये रक्कम वसूल झाली. न्यायालयीन प्रलंबित ५५० प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी २९ प्रकरणे निकाली होऊन ७ लाख ९१ हजार २१४ रुपये रक्कम वसूल झाली. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक आर. आर. तारी, एन. एस. सावंत, तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपिक व्ही. एम. मीर आदींसह न्यायालयीन कर्मचारी, पोलिस उपस्थित होते.
......................
सावंतवाडीत
‘एकता दहीहंडी’
सावंतवाडी ः येथील मुजीब शेख मित्रमंडळाकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘एकता दहीहंडी’चे आयोजन केले आहे. हा उत्सव १९ ला येथील गांधी चौकात होणार आहे. सहभागी गोविंदा पथकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पथकांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे. गेली काही वर्षे सावंतवाडी येथील आकर्षक आणि नावीन्यपूर्ण दहीहंडी उत्सव अशी ओळख या मंडळाच्या उत्सवाची झाली आहे. कोरोना प्रतिबंध मुक्तीनंतर यावर्षी खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा उत्साहपूर्ण वातावरणात हा उत्सव होईल. गांधीचौक येथील वसंत प्लाझा इमारतीच्या परिसरात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुजीब शेख मित्रमंडळाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87131 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..