रत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग
रत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग

रत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग

sakal_logo
By

43251 ः संग्रहीत
.........
स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी, खादीसाठी नोकरीवर पाणी!

देवरुखातील शेंडे दाम्पत्याची शोर्यगाथा; चौकात सभेला चौघेच, पण रस्ता होता भरलेला
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १४ ः मुंबईला बोरीबंदर स्टेशनवर जनरल पोस्टात खादीची टोपी, सदरा, धोतर यावरून वरिष्ठांची बोलणी खावी लागत, म्हणून त्यानी नोकरी सोडली. मसुरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर इंग्रजांकडून थांबवले गेले. सर्वजण पसार झाले. घरी आल्या आल्या या कार्यकर्त्याने शहरातील माणिक चौकात सभा घेतली. पोलिसांच्या भीतीमुळे चारच माणसं होती. पण रस्ता मात्र भरला होता. ही गाथा आहे, स्वातंत्र्य सैनिक नरहर लक्ष्मण उर्फ दादा शेंडे यांची, अशी माहिती विजया फडके यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सकाळशी बोलताना त्या म्हणाल्या, देवरुखातील सभेनंतर दादा शेंडेसह दादा सार्दळनाही अटक झाली. चिपळूणच्या कोर्टात दादांना अडीच वर्ष व सार्दळना सहा महिने शिक्षा झाली .दादा शेंडे यांचा जन्म मे १८९८ मध्ये झाला. त्यांच्या इतक्याच तडफेने त्यांची पत्नी पार्वती नरहर शेंडे उर्फ ताईनीही काम केले. ताईंचा जन्म १९०८ ला देवरूखमध्ये झाला. १९३५/३६ सालामध्ये दाभोळे येथे हरिजन वस्तीमध्ये प्लेगची साथ आली होती. संपूर्ण संपूर्ण वाडी जमीनदोस्त झाली होती. त्यात एक वर्षाची मुलगी वाचली होती. तिला दादा घेऊन आले. तिला दुधाची पावडर पोचवत होते. कायदेभंग चळवळ स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी चालू ठेवली. साखरप्याचे गांधी हायस्कूलचे उद्घाटन जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झाले. त्यांचा सन्मान करण्याचा मानही दादांना मिळाला होता. देवरूख विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना त्यांनी स्वतःच्या घरीच केली. तसेच काँग्रेस कमिटी तालुक्याचे कार्यालय त्यांच्या घरीच होते. त्यामुळे ताई असेपर्यंत झेंडावंदन त्यांचे घरी होत होते. पहिला आमदारकीचा मान दादांना मिळाला होता; पण दादांना पदाची अभिलाषा नसल्यामुळे तो मान मामी भुवड यांना मिळवून दिला, अशी आठवण आजही नलिनीताई भुवड सांगतात.
ताई गोकुळच्या मुलांचे कपडे विनामोबदला शिवून देत असत. त्यांनी कीर्तन मंडळ स्थापन केले. त्यामधून मिळालेले पैसे शाळा, गरीब मुले, जळित, पूरग्रस्त यांना देत. वटसावित्री आख्यान करत, कीर्तन प्रवचन करत, मिळालेले पैसाअडका जमा करून लोकार्पण केले. ताईंनी शिवणकाम करून संसार चालवला. त्यातही काटकसर करून भूमिगतांना जेवू-खाऊ घालत होत्या. स्त्रियांना स्वावलंबाचे धडे दिले. शिवणकाम शिकवले, तेही विनामोबदला. वाड्यावस्तीमध्ये जाऊन साफसफाई, प्रबोधनही केले. विठोबाच्या देवळात स्वातंत्र्य चळवळ उभारणीसाठी कीर्तने केल्यामुळे त्यांना तीन महिने शिक्षा झाली. रत्नागिरीच्या जेलमध्ये सव्वा महिना स्त्रिया कैदी नव्हत्या, त्यामुळे नंतरची शिक्षा हिंदल जेलमध्ये पूर्ण केली, अशी आठवणही फडके यांनी सांगितली.
----------------------------------
चौकट
त्यांनी पेन्शन नाकारली
दादा १९७१ सालामध्ये देवाघरी गेले. त्यांची पेन्शन ताईंना मिळाली असती; पण ताईं म्हणाल्या, यजमान असताना त्यांच्या कमाईचे खाल्लं नाही, मग त्यांचं नाव मी का विकू? भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काम केले. पेन्शन मिळेल, म्हणून नाही. त्यांनी पेन्शन घेतली नाही.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87146 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..