रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat१४p३.jpg-
L43169
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थिनीला पुस्तक संच वितरित करताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी.
------------
बाबुराव जोशी ग्रंथालयात पुस्तक वितरण
रत्नागिरी : पुस्तक हे प्रमाण मानून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे, महाविद्यालयाचे ग्रंथालय विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध सुविधा देत आहे, या योजनांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तक पेढी योजनेमार्फत लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तक संच वितरित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रम झाला. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, मागासवर्गीय सेलचे सदस्य डॉ. एस. डी. मधाळे उपस्थित होते. ग्रंथालयात कमवा व शिका योजनेत काम करणारी विद्यार्थिनी आम्रपाली कांबळे हिने स्वागत केले. प्रास्ताविक ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी केले. त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन उत्पल वाकडे यांनी केले.
--------------
माहेर बालगृहामध्ये
व्यवस्थापन समितीची बैठक
रत्नागिरी : हातखंबा येथील माहेर बालगृह संस्थेची व्यवस्थापन समितीची सभा नुकतीच झाली. सभेमध्ये बालगृहामधील बालकांच्या शिक्षण व पुनर्वसन, प्रतिपालकत्व, बालगृहातील वेळापत्रक, बालकांच्या सूचना यासंदर्भात चर्चा झाली. बाल न्याय अधिनियम अंतर्गत प्रत्येक संस्थेत व्यवस्थापनासाठी आणि प्रत्येक बालकाच्या प्रगतीचे सनियंत्रण करण्यासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केलेली असते. वैयक्तिक काळजी आराखड्यानुसार योग्य संगोपन व उपचार यांची सुनिश्चिती होण्यासाठी वय, आवश्यक संगोपनाचा प्रकार, शारीरिक व मानसिक आरोग्य आणि वास्तव्याचा कालावधी या आधारावर बालकांसाठी ही समिती कार्यरत असते. बैठकीला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, सचिव सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन, समुपदेशक मीरा गायकवाड, शिक्षक शितल हिवराळे, प्रवेशित प्रतिनिधी बिसना थापा, विशाखा नार्वेकर व संस्थांतर्गत बाल संरक्षण अधिकारी अनिल गायकवाड उपस्थित होते.
-----------
-rat१४p४.jpg
43170
- रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात मॅरेथॉनच्या सांगतेप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी.
---------------
फिनोलेक्समध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. अॅकॅडमीच्या क्रीडा समितीमार्फत विद्यार्थ्यांची मॅरेथॉन व रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये विविधतेमध्ये एकता आणि राष्ट्रीय भावना जागरूक करणे, परस्पर संवाद वाढवणे, परस्पर समंजसपणा निर्माण करणे, आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा याचा हेतू होता. या कार्यक्रमात १५० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्साहाने भाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डीन फॅकल्टी व क्रीडा प्रमुख डॉ. संजय कुलकर्णी, प्रा. प्रशांत गिरी, अमेय रायकर, प्रा. उमेश सामंत, प्रा. अभिजित दाते यांनी परिश्रम घेतले.
----------------------
-rat१४p५.jpg
43171
- रत्नागिरी : आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळा, सविता कामत विद्यांमदिरच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी तिरंगा जनजागरणासाठी फेरी काढली.
----------------
आविष्कारमध्ये स्वातंत्र्यदिनी उपक्रम
रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळा व सौ. सविता कामत विद्यामंदिरतर्फे विविध उपक्रम साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वत: तिरंगा तयार करावा, याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी फळ्यावर तिरंग्यात रंगभरण, रांगोळीतून तिरंगा निर्मिती तसेच प्रत्येकाने आपल्या कलेतून, चित्र कलेतून तिरंगा निर्मिती केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी व पालकांनी मिळून बटाट्याच्या ठसे कामातून मोठा ध्वज तयार केला. विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाबाबत चित्रफितीतून माहिती व महत्व सांगण्यात आले. याकरिता स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ते अमृत महोत्सव पर्यंतच्या काळाचे पीपीटीच्या माध्यमातून चलचित्र दाखवून मुलांना माहिती देण्यात आली. छोटी फिल्म तयार करुन त्याची माहिती निदेशक नेहा शिवलकर, सचिन चव्हाण यांनी दिली. घरोघरी तिरंगा घोषवाक्यातून जल्लोष करत विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली. सचिन वायंगणकर आणि मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी शाळा व कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा दिली.
-----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87176 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..