लांजा येथे आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा येथे आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
लांजा येथे आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

लांजा येथे आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा

sakal_logo
By

लांजा येथे आज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
लांजा ः तालुक्यातील पुनसकोंड येथील मुंबईस्थित उद्योजक सुनील दत्ताराम कदम यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने सोमवारी (ता. १५) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिवशी आयोजित केला आहे. सकाळी सव्वा नऊ वाजता लांजा तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रमोद कदम यांच्या हस्ते हा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या वेळी आमदार राजन साळवी, उद्योजक सुनील कदम उपस्थित राहणार आहेत.
------
श्रावणी गोळवस्करचे निबंध स्पर्धेत यश
राजापूरः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजापूर तालुका पातळीवर लेखन, निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये मौजे पेंडखले, तेलीवाडीतील श्रावणी शशिकांत गोळवस्कर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तिचा सत्कार राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. श्रावणी ही जिल्हा परिषद पेंडखले शाळा क्र. २ ची विद्यार्थिनी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87177 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..