कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वाढीव फेर्‍या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वाढीव फेर्‍या
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वाढीव फेर्‍या

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वाढीव फेर्‍या

sakal_logo
By

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे
मार्गावर वाढीव फेऱ्या
रत्नागिरी, ता. १४ : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी वाढीव फेऱ्या जाहीर केल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ, कुडाळ ते पनवेल तसेच सावंतवाडी ते पनवेल दरम्यान गणपती विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ, कुडाळ ते पनवेल, तसेच सावंतवाडी ते पनवेल या गणपती विशेष गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ विशेष गाडी २४ ऑगस्टला मध्यरात्री १२.४५ सुटेल आणि त्याच दिवशी ती कुडाळला सकाळी ११ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कुडाळ येथून २५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ती मुंबईत लो. टिळक टर्मिनसला ११ वा. ५५ मिनिटांनी पोहोचेल. दुसरी अतिरिक्त गणपती विशेष गाडी कुडाळ ते पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी कुडाळहून २४ ऑगस्टला दुपारी १२ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.५५ वाजता पनवेलला पोहचेल. पनवेल ते कुडाळ मार्गावर धावताना ही गाडी पनवेल येथून २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती कुडाळला सकाळी ९ वाजता पोहोचेल. तिसरी विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी मार्गावर धावणार आहे. ती २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.५५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे ४ वाजता ते सिंधुदुर्गात सावंतवाडी स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सावंतवाडी येथून २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वा. ४० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87180 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..