देशाभिमानी उपक्रम कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाभिमानी उपक्रम कौतुकास्पद
देशाभिमानी उपक्रम कौतुकास्पद

देशाभिमानी उपक्रम कौतुकास्पद

sakal_logo
By

43272
कुडाळ ः स्पर्धा उद्‍घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, विनायक कुराडे, बिडीओ विजय चव्हाण आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

देशाभिमानी उपक्रम कौतुकास्पद

सीईओ प्रजित नायर ः देशभक्तीपर गीत स्पर्धेचे कुडाळमध्ये उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः कुडाळ तालुका पंचायत समितीने ‘आजादी का अमृतमहोत्सव’ निमित्त राबविलेले देशाभिमान जागृत करणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी प्रजित नायर यांनी आज देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी केले. १६ ला रंगांचा पोषण खाद्य महोत्सव व ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्पर्धा होणार आहे.
कुडाळ तालुका पंचायत समितीच्या वतीने ९ ते १७ या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पंचायत समितीच्या प्रांगणात साकारलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव सेल्फी पॉइंट''च्या ठिकाणी देशभक्तीपर गीत स्पर्धेचे उद्घाटन श्री. नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक व पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी एम. एम. शेख यांनी बिगुल वाजवून या सोहळ्यात रंगत आणली. स्टेट बँकेचे अधिकारी विनायक कुराडे, प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, बाल विकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर-पई, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, उपअभियंता जलसंधारण लक्ष्मण डुबळे, तालुका वैदयकीय अधिकारी संदेश कांबळे, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी महादेव खरात, दत्ताराम आंबेरकर, रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, अक्षता बुचडे, संजय चौकेकर, नंदकुमार धामापूरकर, रवी पोवार, महादेव तेली, परीक्षक राजाराम गवाणकर व मोहन मेस्त्री तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी स्वातंत्र्यसैनिक शेख यांचा नायर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव टीशर्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
.................
चौकट
उद्या खाद्यमहोत्सव, व्यक्तिरेखा स्पर्धा
आजादी का अमृत महोत्सवांतर्गत १६ ला एकात्मिक बाल विकास प्रकल्प कुडाळच्या वतीने तालुक्यातील आठ बीट अंतर्गत आठ रंगांचा पोषण खाद्य महोत्सव होणार आहे. या महोत्सवात आठ बिटांचे खाद्यपदार्थ असणाऱ्या प्रत्येक स्टॉलवर २१ विविध पदार्थ असणार आहेत. तर कुडाळ पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्य़ांचा नववा विविध रंग दर्शविणारा ७५ खाद्यपदार्थ असणारा खाद्य स्टॉल महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. याच दिवशी ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या दिवशी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार असल्याचे समितीचे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87191 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..