दाभोळ-सहकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-सहकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव
दाभोळ-सहकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

दाभोळ-सहकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

sakal_logo
By

.
१४ पी २९-
L43288
दापोली : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ब्राह्मण हितवर्धिनी सहकारी पतसंस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांचा गौरव करताना जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे.
-----------
सहकारात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

दाभोळ, ता. १४ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दापोली तालुक्यातील सहकारी संस्थांच्या वतीने आर्थिक साक्षरता प्रशिक्षण व सहकार महोत्सव झाला. दापोली शहरातील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दापोली अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात यांनी आर्थिक साक्षरता, राजस पाठक यांनी मोबाईल बँकिंग व सायबर गुन्हे, सीए संदीप खोचरे यांनी आयकर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सहकारातील विविध क्षेत्रांत काम केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. तसेच दापोली तालुक्यात सहकारात प्रथम नोंदणी झालेल्या दापोली अर्बन बँक, दापोली ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (पतसंस्था), साखळोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (सोसायटी), श्रीराम मच्छिमार सहकारी सोसायटी (मच्छिमार संस्था), नीलसागर सहकारी मजूर संस्था (मजूर संस्था), सुंदरमठ सहकारी गृहनिर्माण संस्था (गृहनिर्माण संस्था) यांना गौरविण्यात आले. सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी संस्था म्हणून ब्राह्मण हितवर्धिनी सहकारी पतसंस्था (पतसंस्था गट), आसूद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (विविध कार्यकारी सोसायटी गट) यांचा गौरव करण्यात आला.
...
चौकट
मान्यवरांचाही सत्कार
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सोपान शिंदे, सहायक निबंधक (सहकारी संस्था) तृप्ती उपाध्ये व रोहिदास बांगर, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुधीर कालेकर यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87197 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..