खेड-खेडमध्ये सैनिक स्कूलची प्रभातफेरी खास आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेडमध्ये सैनिक स्कूलची प्रभातफेरी खास आकर्षण
खेड-खेडमध्ये सैनिक स्कूलची प्रभातफेरी खास आकर्षण

खेड-खेडमध्ये सैनिक स्कूलची प्रभातफेरी खास आकर्षण

sakal_logo
By

(जाहिरातदार आहेत. दोन्ही फोटो घ्यावेत.)
-rat१४p२७.jpg
L43286
- खेड ः जामगे येथील छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलामी दिली.
---
-rat१४p२८.jpg
43287
- प्रभातफेरीमध्ये सहभागी झालेले शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे विद्यार्थी आणि शिक्षक.
-------------
खेडमध्ये सैनिक स्कूलची प्रभातफेरी खास आकर्षण

हर घर तिरंगा मोहीम; ढोल-ताशांचा गजर, लेझीम नृत्य लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : केंद्र शासनाच्या ''हर घर तिरंगा'' उपक्रमांतर्गत संपूर्ण खेड शहरामध्ये काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सैनिक स्कूलची प्रभातफेरी खास आकर्षक ठरली. यावेळी संस्थेच्या योगिता दंत महाविद्यालयासह अन्य शाळा देखील सहभागी झाल्या होत्या.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ''हर घर तिरंगा'' या केंद्र शासनाच्या उपक्रमाबाबत जनजागृतीसाठी खेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून ते तीनबत्ती नाकापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीमध्ये खेड शहरातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. सैनिक स्कूलमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे, तर योगिता दंत महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या तालावर लेझीम नृत्य सादर केले. या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या हातात तिरंगा व घोषवाक्यांचे फलक घेत ''तिरंगा आहे आमची शान, देशासाठी देवू प्राण'' अशी घोषणा देत प्रभातफेरीमध्ये देशप्रेम व्यक्त केले. प्रभातफेरीचे उद्घाटन प्रांताधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते झाले. तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलिस निरीक्षक निशा जाधव, खेड मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, सैनिक स्कूलचे श्री. खोत, योगिता दंत महाविद्यालयाच्या हेमांगी पोळ आदी उपस्थित होते.
..
चौकट
शिक्षकांचे कौतुक
विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांमधील पोशाख परिधान करून प्रत्यक्ष संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत राष्ट्रध्वजाचे स्वरूप कसे बदलत गेले, याचे फलकांच्या माध्यमातून सादरीकरण करून जनजागृती केली. या प्रभातफेरीमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87206 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..