राजापूर- हातिवले- कोंडयेत सापडले दुर्मिळ पिसोरी हरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर- हातिवले- कोंडयेत सापडले दुर्मिळ पिसोरी हरण
राजापूर- हातिवले- कोंडयेत सापडले दुर्मिळ पिसोरी हरण

राजापूर- हातिवले- कोंडयेत सापडले दुर्मिळ पिसोरी हरण

sakal_logo
By

-rat14p23.jpg-
43263
हातिवले ः येथे आढळलेले दुर्मिळ पिसोरी हरीण.


हातिवले-कोंड्येत सापडले दुर्मिळ पिसोरी हरीण

कळपातून चुकल्याने भरकटले; सुरक्षित जंगलात सोडले

राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील हातिवले कोंड्ये येथे एक दुर्मिळ पिसोरी हरण आढळले. हे छोटे हरण कळपातून चुकल्याने भरकटले असण्याची शक्यता असून, ते घाबरलेल्या अवस्थेत होते. ग्रामस्थांनी या हरणाला पकडून जंगलात सोडले.
जैतापूरमधील अणसुरेचे ग्रामस्थ राकेश कणेरी हे सकाळी कामानिमित्त बाहेर चालले होते. यावेळी सकाळी १० च्या सुमारास महामार्गावरून जात असताना कोंड्येदरम्यान त्यांना हे पिसोरी हरण घाबरलेल्या स्थितीत दिसून आले. कणेरी यांनी याची माहिती शेजारी असलेल्या लोकांना दिली. हातिवले महामार्गावर आढळलेले हे हरीण वाट चुकल्याने व कळप चुकल्याने बिथरले होते. राकेश कणेरी यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुरक्षित जंगलात सोडले. पिसोरी हरणाला जीवनदान दिल्याने कणेरी यांच्यासह ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.
-----------------------------------
चौकट
हरणांमध्ये सर्वांत लहान
पिसुरी तथा पिसोरे हरीण हे सर्व जातीच्या हरणांमध्ये सर्वांत लहान असते. याचे डोके लहान असते, नाकपुढ्या उंदरासारख्या टोकदार असतात. म्हणून त्याला ‘माउस डियर’देखील म्हटले जाते. आशियाई पिसुरी हरीण व आफ्रिकी पिसुरी हरीण या दोन विशिष्ठ जाती आहेत. यातील आशियाई पिसुरी हरिणाची एक उपजात भारतात आढळते. त्यामुळे दुर्मिळ असणारे हे हरीण संवर्धित करणे गरजेचे आहे. हे हरीण फार भित्रे असते. त्यामुळे ते शक्यतो कळपाने व रात्रीच्यावेळी बाहेर पडत असतात.
-----------------------
कोट
आपल्याला देवाने भरभरून निसर्गाची देणगी दिली आहे. परंतु, यात प्राणी नसतील तर निसर्ग अपूर्ण आहे. म्हणूनच आपण जंगली प्राण्यांना वाचवणे गरजेचे आहे.
- राकेश कणेरी, ग्रामस्थ, अणसुरे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87228 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..