खेड-चौपदरीकरणाच्या तक्रारी गडकरींकडे मांडू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-चौपदरीकरणाच्या तक्रारी गडकरींकडे मांडू
खेड-चौपदरीकरणाच्या तक्रारी गडकरींकडे मांडू

खेड-चौपदरीकरणाच्या तक्रारी गडकरींकडे मांडू

sakal_logo
By

-rat14p31.jpg
43305
खेड ः भरणेनाका येथे श्री देवी काळकाईचे दर्शन घेताना उदय सामंत.

-rat14p32.jpg
43306
खेड ः खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे सामंत यांचे स्वागत करताना आमदार योगेश कदम.

-rat14p33.jpg
43319
खेड ः योगिता दंत महाविद्यालयात उदय सामंत यांचे पुप्षगुच्छ देऊन अभिनंदन करताना आमदार योगेश कदम आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कदम आदी.
-----------

चौपदरीकरणाच्या तक्रारी गडकरींकडे मांडू

मंत्री उदय सामंत; खेडमध्ये जंगी स्वागत, महामार्गावरील प्रवास सुखकर होण्यासाठी सूचना

खेड, ता. १४ : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत कोकणी जनतेच्या तक्रारी मांडण्यासाठी प्रसंगी आमदार योगेश कदम यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊ, असे आश्‍वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. १४) दिले. कोकणाच्या जिव्हाळ्याचा विषय मुंबई-गोवा महामार्ग हा असून, या मार्गाची मी पाहणी करत आहे. परशुराम घाट व पर्यायी मार्ग वाहतुकीस सुलभ राहावा म्हणून कोणत्या प्रकारे निधी खर्च करता येईल हे तपासून पाहणे गरजेचे आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
राज्य मंत्रिमंडळात उद्योग मंत्री म्हणून पुन्हा समावेश झाल्यानंतर उदय सामंत यांचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खेडमध्ये आमदार योगेश कदम व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीतल्या कशेळी ते राजापूर भागातील समस्या सोडविण्यासाठी वेळ पडल्यास आमदार योगेश कदम व मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ, असे सामंत यांनी सांगितले. चौपदरीकरणाच्या कामाबाबत महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी आहेत. महामार्गावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने गणपतीत प्रवास सुखकर होण्यासाठी तत्काळ उपाययोजनांच्या सूचना अधिकाऱ्यांना करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत यांचे रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी खेड तालुक्यातील कशेडी घाट येथे शेकडो कार्यकर्ते पोहोचले होते. वाहनांच्या ताफ्यासह श्री. सामंत हे भरणेनाका येथे श्री देवी काळकाई मंदिरात गेले व देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे आमदार योगेश कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत केले. महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर श्री. सामंत यांनी योगिता दंत महाविद्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांचे निधन झाल्याने मराठा समाजाचे व महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगामुळे आम्ही सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत.’
------------------------------------------------
चौकट
चिपळूण, रत्नागिरीत पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. शिवसेना भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कोणी संभ्रम पसरवत असतील, तर त्यावर कार्यकर्त्यांनी विश्‍वास ठेवू नये. येत्या काळात कोकणात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मध्यवर्ती कार्यालये सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी खेड येथे दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87241 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..