ईळये, सांगेली शाळेस स्वछ विद्यालय पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईळये, सांगेली शाळेस स्वछ विद्यालय पुरस्कार
ईळये, सांगेली शाळेस स्वछ विद्यालय पुरस्कार

ईळये, सांगेली शाळेस स्वछ विद्यालय पुरस्कार

sakal_logo
By

ईळये, सांगेली शाळेस
स्वछ विद्यालय पुरस्कार

प्रशासनातर्फे आज होणार गौरव

सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः जिल्हा परिषद शाळा इळये क्रमांक १ (ता. देवगड) व जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली (ता. सावंतवाडी) या दोन शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. राष्ट्रीय पुरस्कारासाठी या शाळांचे नामांकन केले आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ साठी राज्यातील ९३.९८ टक्के शाळांनी सहभाग घेतला होता. त्यांचे मूल्यमापन करून जिल्ह्यांनी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रती जिल्हा १४ शाळांचे नामांकन केले होते. राज्यस्तरावरून या शाळांचे मूल्यांकन करून त्यातून २६ शाळांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये ग्रामीण भाग प्राथमिक विभागातनू जिल्हा परिषद शाळा इळये क्रमांक १ तर माध्यमिक विभागातून जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली या शाळांची निवड झाली. शाळेतील पाणी, शौचालये, हात धुण्याची सुविधा, देखभाल दुरुस्ती, क्षमता बांधणी व कोविड (१९) तयारी व प्रतिसाद या सहा घटकांवर मिळणाऱ्या गुणांवरून शाळांची निवड केली. स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या शाळांचा सत्कार उद्या (ता.१५) जिल्हास्तरीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87249 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..