२ मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२ मेन
२ मेन

२ मेन

sakal_logo
By

रिफायनरी प्रकल्पः लोगो
L43326 ः संग्रहीत
...................
एनजीओंकडून समर्थकांना धमक्या

काही एनजींविरोधात तक्रार; शेतकरी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना भेटले, पोलिसांसह प्रशासन ढिम्म
राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील रिफायनरीचा विषय गेली पाच वर्षे प्रलंबित असून तो तत्काळ मार्गी लावावा, तसेच राज्य व देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना काही एनजीओंकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्या विरोधात पोलिसात तकार करूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याची तकार गोवळ, बारसू, सोलगाव येथील शेतकऱ्यांनी येथे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
२०१७ मध्ये नाणार परिसरात हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. मात्र, विस्थापन तसेच धार्मिक स्थळांना बाधा पोहोचणार असल्याने या परिसरात विरोध झाला आणि २०१९ ला अधिसूचना रद्द करण्यात आली. त्यानंतर यावर्षी बारसू, गोवळ, पन्हळे, नाटे परिसरात हा प्रकल्प राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या जागेत घर अथवा मंदिराचे विस्थापन नसल्याने या जागेला राज्य शासनानेही हिरवा कंदील दिला आहे. प्रकल्पाला गती देण्यासाठी १३ जुलै २०२० ला एमआयडीसी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त गावातील लोकप्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी सुमारे साडेचार हजार एकर जमिनीची संमतीपत्रेही देण्यात आली आहेत.
....
चौकट
प्रकल्पाविषयी गैरसमज पसरविण्याचे काम
या परिसरातील जमीन ही कातळपड असल्याने जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, प्रकल्पाला विरोध करण्यासाठी काही एनजीओ स्थानिक ग्रामस्थ व महिलांना एकत्र करून त्यांच्यामध्ये प्रकल्पाविषयी गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. काही ठिकाणी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्यांवर गावात बहिष्कार टाकण्यासाठी या एनजीओंकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, पोलिस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही, अशी तक्रार या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
....
चौकट
पोलिसांना आदेश देण्याची मागणी
जे ग्रामस्थ प्रकल्पाचे समर्थन करतात, त्यांना एनजीओच्या प्रतिनिधींकडून धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत राजापूर पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. सर्व राजकीय पक्ष प्रकल्पाच्या बाजूने असताना केवळ एनजीओ विरोध पसरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे अशा एनजीओंवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे कोकण जनकल्याण समिती अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि शेतकऱ्यांनी केली.
..
चौकट
दर्जेदार आरोग्य तसेच शैक्षणिक सुविधा शक्‍य
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रिफायनरी आवश्यक असून लाखो बेरोजगार तरुणांना यामुळे नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. शिवाय जिल्ह्याच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होणार आहे. प्रकल्पामुळे या ठिकाणी दर्जेदार आरोग्य तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण होणार आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील १२५ गावे व ५५ सामाजिक संघटनांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
...
ग्राफ करावा
एक नजर..
राजापूर तालुक्यातून प्रकल्पाचे स्वागतः
गावेः १२५
सामाजिक संघटनाः ५५
जमिनीची संमतीपत्रेः सुमारे साडेचार हजार एकर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87252 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..