न्याय तातडीने होणे हाच उद्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्याय तातडीने होणे हाच उद्देश
न्याय तातडीने होणे हाच उद्देश

न्याय तातडीने होणे हाच उद्देश

sakal_logo
By

43331
सिंधुदुर्गनगरी ः वैकल्पिक वाद निवारण केंद्र इमारतीचे उद्‍घाटन करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई. सोबत कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, उच्च न्यायालय न्यायाधीश पी. बी. वराळे, पालक न्यायाधीश प्रकाश नाईक आदी.

न्याय तातडीने होणे हाच उद्देश

न्यायमूर्ती भूषण गवई ः सिंधुदुर्गनगरीत विधी सेवा सदानाचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १४ ः घटनेने दिलेले अधिकार माहीत नसतील तर त्याचा काय उपयोग? म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध असते. राष्ट्रीयस्तरावर विविध विधी सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ७२ वर्षांच्या कालखंडात देशाच्या प्रत्येक नागरिकाला कायद्याने सन्मान दिला. न्याय जलदगतीने व कमी खर्चात मिळाला तर न्याय व्यवस्थेचा उद्देश सफल होईल. यासाठी लोक अदालती आयोजित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न झाला पाहिजे, असे आवाहन सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
जिल्हा विधी सेवा समितीच्यावतीने उभारलेल्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन आज झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गवई बोलत होते.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. वराळे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायाधीश पी. डी. नाईक, सिंधुदुर्ग पुत्र तथा ग्राहक आयोग अध्यक्ष सुरेंद्र तावडे, राज्य विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव दिनेश सुराणा, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सेवा सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दीपक म्हालटकर, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सौ. सानिका जोशी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी-बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्य पारिजात पांडे, ज्येष्ठ वकील अजित भणगे, सुभाष पणदुरकर, अजित गोगटे, बी. एम. दळवी, डी. के. गावकर, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अमोल मालवणकर, सहसचिव अॅड. यतीन खानोलकर, उपाध्यक्षा वेदिका राऊळ, उपाध्यक्ष गिरीश गिरकर, कोषाध्यक्ष प्रकाश बोडस यांच्यासह अमोल सामंत, सुहास साटम, विवेक मांडकुलकर, राजेश परुळेकर, महेश शिंपूकडे, अविनाश परब, सुहास सावंत, शार्दुल पिंगुळकर, कोमल काकतकर, प्रणिता कोटकर, हितेश कुडाळकर, जिल्हा सरकारी वकील संदीप राणे, रुपेश देसाई आदी उपस्थित होते. अॅड. सावंत व विलास परब यांनी सूत्रसंचलन केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश हांडे यांनी आभार मानले. संग्राम देसाई यांनी प्रास्ताविक केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वराळे म्हणाले की, जिल्ह्यात विधी सेवा समितीची राज्यातील २७ वी इमारत आहे. शनिवारी राज्यभर झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तब्बल ९ लाख प्रकरणे तडजोडीने मिटली आहेत. जिल्ह्याचे पालक न्यायाधीश नाईक म्हणाले की, लोक अदालती वकिलांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाल्या आहेत. प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून विधी सेवा समिती राष्ट्रीयस्तरापासून तालुका स्तरापर्यंत कार्यरत आहे.

डॉयलॉगमुळे एकच हशा
अलीकडेच राज्यात घडलेल्या सत्ता नाट्यावेळी आमदार शहाजी बापू यांचा ‘काय ती झाडी, काय त्यो डोंगुर’, असा डायलॉग चांगलाच गाजला होता. या डायलॉगच्या धर्तीवर न्यायाधीश गवई, न्यायाधीश वराळे आणि संग्राम देसाई यांनी जिल्ह्याच्या सौंदर्याचे वर्णन केले. यामुळे वकील वर्गात चांगलाच हशा पिकला. न्यायाधीश हांडे यांनी आभार मानताना राष्ट्रीय लोक अदालतीचे वर्णनही ‘‘काय ते पक्षकार’’ शहाजी बापू यांच्याच काव्य पंक्तीत बसवीत सादर केले. त्यामुळे शहाजी बापूंच्या ‘त्या’ डायलॉगची लोकप्रियता अद्याप घसरली नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
--
कोल्हापूरमध्ये खंडपिठासाठी उत्सुक
कॅबिनेट मंत्री केसरकर म्हणाले, सुरुवातीला न्याय व्यवस्था राजांच्या माध्यमातून चालविली जात असे. आता ती स्वतंत्र न्याय व्यवस्थेमार्फत चालविली जात आहे. न्याय हा सुलभपणे मिळाला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसे घडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मध्यस्थी केली जात नसल्याने वाद होतात. कोल्हापूर खंडपीठासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी याबाबत चर्चा करू.’’ दरम्यान, यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई यांनी, ‘‘कोल्हापूर खंडपीठ झाले तर जलदगतीने न्यायदान होण्यास मदत होईल’’, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87263 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..